Home » Blog » Hall of fame : मायकेल बेव्हन ‘हॉल ऑफ फेम’मध्ये

Hall of fame : मायकेल बेव्हन ‘हॉल ऑफ फेम’मध्ये

वन-डे क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर समावेश

by प्रतिनिधी
0 comments

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू मायकेल बेव्हनचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. देशासाठी सर्वांत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानार्थ त्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात येतो. बेव्हनने ऑस्ट्रेलियातर्फे वन-डे क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारे त्याला ‘हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान देण्यात आले. (Hall of fame)

बेव्हनने १९९४ ते २००४ दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये २३२ वन-डे सामन्यांत ६ शतके व ४६ अर्धशतकांसह ६,९१२ धावा केल्या. त्याची वनडेतील सरासरी ५३.५८ इतकी होती. याबरोबरच त्याने वन-डेमध्ये ३६ विकेटही घेतल्या आहेत. त्याने कारकिर्दीत केवळ १८ कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर ७८५ धावा व २९ विकेट जमा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या १९९९ आणि २००३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघामध्ये बेव्हनचा समावेश होता. (Hall of fame)

आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ‘हॉल ऑफ फेम’मधील समावेशासाठी कसोटी क्रिकेटमधील कामगिरी विचारात घेतली जात होती. तथापि, बेव्हनची वन-डे क्रिकेटमधील कामगिरी पाहून ‘हॉल ऑफ फेम’च्या समितीने निवडीच्या निकषांमध्ये बदल केल्याची माहिती अध्यक्ष पीटर किंग यांनी दिली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये बेव्हन न्यू साउथ वेल्स, टास्मानिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया, यॉर्कशायर, ससेक्स, लिस्टरशायर आणि केंट या संघांकडून खेळला. त्याच्या नावावर २३७ प्रथमश्रेणी सामन्यांत ५७.३२च्या सरासरीने १९,१४७ धावा जमा असून त्यामध्ये ६८ शतके व ८१ अर्धशतकांचा समावेश आहे. (Hall of fame)

बेव्हनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये क्रांती घडवली असून आपल्या कामगिरीने तो घराघरांत पोहोचला. यांपुढे कसोटीबरोबरच वन-डे व टी-२० क्रिकेटमध्येही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘हॉल ऑफ फेम’ची दारे खुली होतील, असेही किंग म्हणाले. “दडपणाच्या परिस्थितीत संघासाठी उपयुक्त खेळ करण्याची बेव्हनची हातोटी वाखाणण्याजोगी होती. त्यामुळेच तो इतक्या वर्षांनंतरही क्रिकेटप्रेमींमध्ये तितकाच लोकप्रिय आहे,” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले यांनी सांगितले. (Hall of fame)

 

हेही वाचा :

प्रज्ञनंदा टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’

भारत दुसऱ्यांदा जगज्जेता

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00