Home » Blog » Girl butchered: म. प्र. मध्ये भर रूग्णालयात विद्यार्थिनीचा चिरला गळा

Girl butchered: म. प्र. मध्ये भर रूग्णालयात विद्यार्थिनीचा चिरला गळा

by प्रतिनिधी
0 comments
Girl butchered

भोपाळ : मध्य प्रदेशातील एका जिल्हा रुग्णालयात एका कथित प्रियकराने बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नरसिंहपूर जिल्ह्यात ही घटना घडली. (Girl butchered)

संध्या चौधरी असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. तिची हत्या करणारा अभिषेक कोष्टी हा कथितरित्या तिचा प्रियकर असल्याची माहिती समोर येत आहे.

एका रुग्णाला पाहण्यासाठी संध्या रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरबाहेर बसली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर हल्ला केला. यावेळी रुग्णलयात अनेक अटेंडंट आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. मात्र कुणीही तिच्या मदतीसाठी धावून गेले नाही. (Girl butchered)

फुटेजमध्ये कोष्टी संध्याच्या जवळ आला. काही वेळ तिच्याशी बोलू लागला. त्यानंतर लगेचच त्याने तिच्यावर हल्ला केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चाकूने गळा चिरून त्याने मोटारसायकलवरून पलायन केल्याचे दिसत आहे. अति रक्तस्त्राव झाल्यामुळे संध्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना पाहणाऱ्या एका नर्सिंग अधिकाऱ्याने पोलिसांना माहिती दिली. संध्यावर हल्ला झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोष्टीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘‘समोर येऊ नका, अन्यथा मारून टाकीन,’’ अशी धमकी त्याने दिल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Girl butchered)

संध्या ही नरसिंहपूरमधील पटेल वॉर्डमध्ये राहत होती. ती प्रसूती वॉर्डमध्ये दाखल असलेल्या एका ओळखीच्या महिलेला भेटण्यासाठी रुग्णालयात आली होती.

ती ट्रॉमा सेंटरच्या खोली क्रमांक २२ बाहेर बसली होती. त्यावेळी कोष्टीने तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

पोलिसांनी सांगितले की कोष्टी २७ जून रोजी दुपारपासून वारंवार रुग्णालयात येत असल्याचे फुटेजमध्ये दिसते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचली. तपासादरम्यान संध्याचा मृतदेह अनेक तास त्या ठिकाणीच होता.

हेही वाचा :
‘शक्तीपीठ’ विरोधात १२ जिल्ह्यात चक्काजाम
‘मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा नाही…’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00