संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटनेने (FAO) प्रसिद्ध केलेल्या “ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट २०२५ (FRA 2025) या नव्या अहवालानुसार, गेल्या दशकभरात जगभरात वनांची तोड (deforestation) काही प्रमाणात कमी झाली आहे. (FRA 2025: deforestation)
हा अहवाल दर पाच वर्षांनी प्रसिद्ध केला जातो. त्याची २०२५ ची आवृत्ती २१ ऑक्टोबर २०२५ रोजी इंडोनेशियातील बाली येथे प्रकाशित झाली. “ग्लोबल फॉरेस्ट ऑब्झर्वेशन्स इनिशिएटिव्ह प्लेनरी” या परिषदेत अहवालाचे प्रकाशन झाले.
जगातील सध्याची वनस्थिती
ताज्या आकडेवारीनुसार, सध्या पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या सुमारे एक-तृतीयांश भागावर — म्हणजेच ४.१४ अब्ज हेक्टर क्षेत्रफळावर जंगले आहेत. अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत वनांबाबत काही सकारात्मक बदलही दिसून येतात. (FRA 2025: deforestation)
जगातील अर्ध्याहून अधिक वने दीर्घकालीन व्यवस्थापन योजनांखाली आणली गेली आहेत.
सुमारे वीस टक्के वने आता कायदेशीररीत्या संरक्षित क्षेत्रांत (protected areas) समाविष्ट आहेत. तरीदेखील, वन परिसंस्था (forest ecosystems) अजूनही गंभीर संकटांचा सामना करीत आहेत. सध्या वनतोडीचा दर दरवर्षी १०.९ दशलक्ष (१.०९ कोटी) हेक्टर आहे — म्हणजे अजूनही चिंताजनक पातळीवर.
वनांचे महत्त्व
जंगल हे — अन्नसुरक्षा, स्थानिक उपजीविका, नवीकरणीय जैविक पदार्थ (biological resources) आणि ऊर्जेचा स्रोत
या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. जगातील जैवविविधतेचा (biodiversity) मोठा भाग याच वनांमध्ये आढळतो. जंगले जागतिक कार्बन चक्र आणि जलचक्र संतुलित ठेवतात. तसेच दुष्काळ, वाळवंटीकरण, भूस्खलन आणि पूर यांसारख्या आपत्तींचे परिणाम कमी करण्यास मदत करतात.
FAO प्रमुखांचे मत
FAO चे महासंचालक क्यू डोंगयू (Qu Dongyu) यांनी अहवालाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे —
“FRA हा जगभरातील वनांची स्थिती, त्यांचे संसाधन, व्यवस्थापन आणि उपयोग यांचा सर्वांत व्यापक आणि विश्वासार्ह आढावा आहे. या अहवालातून आपण— जगात किती वने आहेत, ती कशी वापरली जातात, आणि त्यांचे संवर्धन कसे केले जाते, यासंदर्भात जाणून घेऊ शकतो. म्हणजेच हा अहवाल वनांशी संबंधित सर्व आवश्यक माहिती एकत्र करतो. जेणेकरून सरकारे आणि समाज चिरंतन विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेऊ शकतील.”
FAO प्रमुखांचे मत
वनक्षेत्र (Forest Area)
जगभरात एकूण ४.१४ अब्ज हेक्टर जमीन वनीकरणाखाली आहे — म्हणजे पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या ३२ टक्के.
प्रत्येक व्यक्तीला सरासरी ०.५ हेक्टर वनक्षेत्र मिळते. जगातील सुमारे अर्धी वने उष्णकटिबंधीय (tropical) प्रदेशात आहेत.
1990 च्या दशकात दरवर्षी १०.७ दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र कमी होत होते. आता २०१५-२०२५ दरम्यान ती घट कमी होऊन ४.१२ दशलक्ष हेक्टर प्रति वर्ष इतकी राहिली आहे.
वनतोड आणि विस्तार (Deforestation and Expansion)
१९९०-२००० दरम्यान वनतोडीचा दर १७.६ दशलक्ष हेक्टर/वर्ष होता. तो २०१५-२५ मध्ये घटून १०.९ दशलक्ष हेक्टर/वर्ष झाला आहे. मात्र, या काळात नवीन वने वाढवण्याचा दरही घटला. २०१५-२५ मध्ये ९.८८ दशलक्ष हेक्टर/वर्ष होता, जो आता ६.७८ दशलक्ष हेक्टर/वर्ष राहिला आहे. (FRA 2025: deforestation)
ही वने एकूण वनक्षेत्राच्या ९२ टक्के (३.८३ अब्ज हेक्टर) भाग व्यापतात. १९९० ते २०२५ दरम्यान अशा वनोंमध्ये ३२४ दशलक्ष हेक्टरची घट झाली, पण घटण्याचा वेग आता मंदावला आहे. गेल्या दशकात अशी घट आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथे सर्वाधिक झाली, तर युरोपात नैसर्गिक वनांमध्ये वाढ झाली आहे.
एकूण १.१८ अब्ज हेक्टर क्षेत्र प्राथमिक वनोंखाली आहे. म्हणजे जगातील एकूण वनक्षेत्राच्या सुमारे एक-तृतीयांश. या वनांचा नाश अजून सुरू आहे, पण २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या तुलनेत आता दर अर्धा झाला आहे. (FRA 2025: deforestation)
कृत्रिम किंवा लागवड केलेली वने (Planted Forests)
जगातील सुमारे आठ टक्के वने कृत्रिमरीत्या तयार केलेली आहेत — म्हणजे अंदाजे ३१२ दशलक्ष हेक्टर क्षेत्र. १९९० नंतर सर्व प्रदेशांत अशी वने वाढली, मात्र गेल्या दशकात या वाढीचा वेग मंदावला आहे. (FRA 2025: deforestation)
जगातील वनोंमध्ये सुमारे ६३० अब्ज घनमीटर लाकूड (growth stock) आहे. कार्बन साठाही वाढून आता ७१४ गीगाटन झाला आहे.
संरक्षित क्षेत्र (Protected Areas)
सुमारे वीस टक्के वने (८१३ दशलक्ष हेक्टर) आता कायदेशीर संरक्षित क्षेत्रांत आहेत. १९९० पासून आतापर्यंत अशा क्षेत्रांत २५१ दशलक्ष हेक्टरची वाढ झाली आहे. जगातील ५५ टक्के वने म्हणजे सुमारे २.२३ अब्ज हेक्टर क्षेत्र प्रशासकीय/व्यवस्थापन योजनांखाली आहे. १९९० पासून हे क्षेत्र ३६५ दशलक्ष हेक्टरने वाढले आहे. (FRA 2025: deforestation)
वनांना होणारे नुकसान (Forest Damage). दरवर्षी सरासरी २६१ दशलक्ष हेक्टर जमीन आगीनं प्रभावित होते,त्यातील सुमारे अर्धा भाग जंगलांचा असतो. वर्ष २०२० मध्ये कीटक, रोग आणि अतिवृष्टी/दुष्काळासारख्या हवामान घटकांमुळे सुमारे ४१ दशलक्ष हेक्टर वने नष्ट झाली. तीही विशेषतः समशीतोष्ण (temperate) आणि उपध्रुवीय (subpolar) भागांमध्ये. (FRA 2025: deforestation)
वनांची मालकी (Ownership)
जगातील ७१ टक्के वने सरकारी मालकीची आहेत. तर २४ टक्के वने खाजगी मालकीची आहेत. उर्वरित वनांबाबत मालकीची स्थिती अस्पष्ट आहे.
सुमारे १.२० अब्ज हेक्टर (२९%) वने मुख्यतः उत्पादनासाठी (production) वापरली जातात. ६१६ दशलक्ष हेक्टर वने बहुउद्देशीय उपयोगासाठी (multiple use) व्यवस्थापित आहेत. (FRA 2025: deforestation)
त्याशिवाय — ४८२ दशलक्ष हेक्टर — जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वापरतात. ३८६ दशलक्ष हेक्टर — माती व जलसंवर्धनासाठी वापरली जातात. २२१ दशलक्ष हेक्टर — सामाजिक सेवा (social services) देण्यासाठी राखीव ठेवली आहेत. (FRA 2025: deforestation)
निष्कर्ष
FAO च्या अहवालातून स्पष्ट होते की, जगभरातील वनतोडीचा वेग कमी झाला आहे. मात्र तरी वनांचे नुकसान अजूनही चिंताजनक आहे. सतत वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक दबाव आणि हवामान बदल या तिन्ही कारणांमुळे वनांवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. यासाठी दीर्घकालीन नियोजन, संरक्षण क्षेत्रांची वाढ आणि शाश्वत (sustainable) वन व्यवस्थापन हाच एकमेव उपाय आहे. (FRA 2025: deforestation)