Home » Blog » Football : बालगोपाल, वेताळमाळ संघाचे विजय

Football : बालगोपाल, वेताळमाळ संघाचे विजय

‘बालगोपाल’कडून चांगल्या खेळाचे दर्शन

by प्रतिनिधी
0 comments
Football

कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस क्लबला ३-१ अशा गोलफरकाने नमवले. तर वेताळमाळ तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर टायब्रेकरमध्ये ४-३ अशी मात केली. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन आयोजित केएसए अ गट वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Football )

बालगोपाल आणि सम्राटनगर संघातील सामन्याची सुरुवात वेगवान झाली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला सम्राटनगरच्या ओंकार जाधवने गोल करत दमदार सुरुवात केली. पण पुढच्याच मिनिटाला बालगोपालच्या टीमॉन याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघांनी सावध खेळ केला. २६ व्या मिनिटाला बालगोपालच्या ऋतुराज पाटीलने गोल करत सामना २-१ असा स्थितीत आणला. हीच स्थिती मध्यंत्तरापर्यंत कायम राहिली.(Football )

उत्तरार्धात बरोबरी साधण्यासाठी सम्राटनगरने चांगल्या चढाया केल्या, पण त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. ६७ व्या मिनिटाला बालगोपालच्या टोमेन सिंगने गोल करत आघाडी घेतली. पूर्ण वेळेत दोन गोलची आघाडी कायम टिकवत बालगोपालने ३-१ असा सामना जिंकून तीन गुण वसूल केले.(Football )

दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात उत्तरेश्वर आणि वेताळमाळ यांच्यातील सामन्यात तुषार पुनाळकरने सातव्या मिनिटाला गोल करत उत्तरेश्वरला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मध्यंत्तरापर्यंत कायम टिकली. उत्तरार्धात ६६ व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकरने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. दोन्ही संघ पूर्णवेळेत गोल करु न शकल्याने सामना बरोबरीत राहिला. मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यामध्ये वेताळमाळने बाजी मारत सामना ४-३ अशा फरकाने जिंकला. वेताळमाळच्या नावावर तीन गुण जमा झाले.

शुक्रवारचे सामने

  • फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ वि. वेताळमाळ तालीम मंडळ : दुपारी २.०० वा.
  • शिवाजी तरुण मंडळ वि. सम्राटनगर स्पोर्टस् क्लब : दुपारी ४.०० वा.

हेही वाचा :

प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

राजस्थान, हरियाणा उपांत्यपूर्व फेरीत

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00