Home » Blog » Five robbers: पाच लुटेरे…

Five robbers: पाच लुटेरे…

देश लुटणाऱ्यांनी किती कोटींचा घोटाळा केला?

by प्रतिनिधी
0 comments
Five robbers

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून देशातून परागंदा झालेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम सरकारने अटक केली आहे. भारताच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) ने केलेल्या विनंतीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. बेल्जियम सरकारनेही सोमवारी (१४ एप्रिल) संध्याकाळी या वृत्ताला दुजोरा दिला. (Five robbers)

मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांवर पंजाब नॅशनल बँकेचा हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

चोक्सी आणि मोदीसारख्या अशा अनेकांनी देशात मोठे घोटाळे केले आहेत. त्यानंतर त्यांनी भारतातून पलायन केले. देशातील तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी ते वेगवेगळ्या देशांत राहत आहे. तथापि यंत्रणांनी या लुटारूंच्या मुसक्या आवळण्याचे आणि त्यांचे प्रत्यार्पण करवून आणण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. (Five robbers)

कोण आहेत हे देशाचे लुटेरे, जाणून घेऊ…

२०१८ सालाच्या सुरूवातीला पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा समोर आला होता. तेव्हा बँकेने मेहुल चोक्सी, नीरव मोदीसह अनेकांविरोधात तक्रार दाखल केली होती.

बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून या आरोपींनी बँकेचे प्रचंड नुकसान केल्याचा आरोप बँकेने केलेल्या तक्रारीत केला होता. (Five robbers)

या प्रकरणाची चौकशी फेब्रुवारी २०१८ मध्ये पूर्ण झाल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला या घोटाळ्याची माहिती दिली.

नीरव मोदी

एकेकाळी मेहुल चोक्सीला भारतातील पोस्टर हिरे व्यावसायातील ‘पोस्टर बॉय’ म्हटले जात असे. पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदी हाही एक आरोपी आहे. त्याने जानेवारी २०१८ मध्ये भारत सोडून पलायन केले.

त्याला १९ मार्च, २०१९मध्ये लंडनच्या हॉबर्नमधील मेट्रो बँकेच्या शाखेतून अटक करण्यात आले होते. तेथे तो बँक अकाउंट उघडण्यासाठी गेला होता. मे २०२०मध्ये लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू झाला होता. (Five robbers) नीरव मोदी कुटुंबीयांचा पारंपरिक हिरे व्यापार आहे. त्याच्या अनेक पिढ्या या व्यवसायात आहेत. भारतात रिटेल ज्वेलरी कंपनी असलेल्या गीतांजली समूहाचे प्रमुख मेहुल चोक्सीसोबत नीरव मोदीने जवळपास दहा वर्षे काम केले. त्यानंतर नीरव मोदीने भारतात फायरस्टार डायमंड नावाने कंपनी सुरू केली.

विजय मल्ल्या

भारत सरकारने केलेल्या दाव्यानुसार, किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्या याने भारतीय बँकांतून ९ हजार कोटी रुपयांवर कर्ज घेतले आहे.

मल्ल्याने त्याच्या किंगफिशर एअरलाइन्स कंपनीसाठी विविध बँकांतून कर्जे घेतली आणि ती न भागवता तो परदेशात पळून गेला. किंगफिशर एअरलाइन्स कंपनी तोट्यात गेली आणि आता ती बंद पडली आहे. (Five robbers)

विजय मल्ल्या मार्च २०१६मध्ये ब्रिटन गेला. तेव्हापासून तो लंडनमध्येच ओ. भारतीय यंत्रणा ब्रिटनच्या कोर्टात मल्ल्याला भारतात आणण्यासाठी कायदेशीर लढाईलढत आहेत. खरेतर भारत आणि ब्रिटनच्या दरम्यान १९९२ मध्ये प्रत्यर्पण करार झालेला आहे. असे असूनही केवळएकाच व्यक्तीचे प्रत्यार्पण आतापर्यंत झाले आहे.

ललित मोदी

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा माजी प्रमुख ललित मोदी २०१० पासून ब्रिटनमध्ये राहत आहे.

आयपीएल प्रमुखपदाच्या कार्यकाळात या मोदीने लिलावामध्ये कथितरित्या हेराफेरी केल्याचा आरोप त्याच्यावर आरोप आहे, तथापि त्याने आपल्यावर होणाऱ्या आरोपांचे नेहमीच खंडन केले आहे. असे असले तरी भारताने त्याच्या प्रत्यार्पणासाठी अनेकदा प्रयत्न केले, परंतु ते सर्व अयशस्वी झाले आहेत. (Five robbers)

ललित मोदीने २००८ मध्ये आयपीएल स्थापण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएल आता काही अब्जावधींचा उद्योग झाला आहे. २०१० मध्ये दोन टीमच्या फ्रेंचाइजीच्या लिलावावेळी ललित मोदीने अफरातफर केल्याचा आरोप आहे. परवानगीशिवाय प्रसारण आणि इंटरनेट अधिकार विकल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

नितीन संदेसरा

गुजरातमधील एक बडा व्यापारी नितीन संदेसरा ५,७०० कोटींचा बँक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील एक प्रमुख आरोपी आहे. संदेसरा स्टर्लिंग बायोटेकचा मालक होता. त्याला पळून गेलेला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. याच प्रकरणात हितेश नरेंद्रभाई पटेल, दीप्ती संदेसरा आणि चेतन संदेसरा या तिघांवरही आरोप आहेत. (Five robbers) २०१७ साली तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली. त्याच्या काही दिवस आधीच हे कुटुंब भारतातून पळून गेले. दुबईमार्गे ते नायजेरियात पळून गेले होते. या कुटुंबाने त्यावेळी नायजेरिया आणि अल्बानिया या दोन्ही देशांचे नागरिकत्व घेतले आहे.

हेही वाचा :
‘ईडी’कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रांची चौकशी
दलित सरसंघचालक कधी करणार?

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00