Home » Blog » Fight at Kalamba Jail: कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी

Fight at Kalamba Jail: कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी

कळंबा तुरुंग महिला अधिकारी जखमी

by प्रतिनिधी
0 comments
Fight at Kalamba Jail

कोल्हापूर : प्रतिनिधी : कळंबा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली. हाणामारी रोखण्यासाठी गेलेल्या महिला अधिकारी कैद्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाली आहे. (Fight at Kalamba Jail)

कैद्याची हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकारी स्वाती लक्ष्मण जाधवर (वय ४१) आणि कैदी अमर सतीश माने हे जखमी झाले आहे. जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर करण राजेंद्र पुरी, व्यंकटेश उर्फ विकी संजय जगदाळे आणि ओम मंगेश माने या कैद्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Fight at Kalamba Jail)

जुना राजवाडा पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. कळंबा कारागृहात मुलाखत कक्षात काही कैदी त्यांच्या नातेवाईकांशी बोलत होते. यावेळी मुलाखत कक्षातून पडलेला कैदी अमर माने याला करण पुरी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना सुमित स्वार्थिक कांबळे आणि सादिक जॉन पिटर हे दोघे कैदी वाद सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी व्यकंटेश उर्फ विकी जगदाळे आणि ओम माने या दोघांनी कांबळे आणि पिटर यांना मारहाण केली. (Fight at Kalamba Jail)

मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या तुरुंग अधिकारी स्वाती जाधवर यांना करण पुरी याने धक्का मारुन पाडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तुरुंग अधिकाऱ्यांनी धाव घेऊन कैद्यांना त्यांच्या बराकीत घालवले. तुरुंगाची शिस्त बिघडवणाऱ्या कैद्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे तुरुंग अधीक्षक विवेक झेंडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

पुणे हादरले; शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार

१७ वर्षाच्या मुलाच्या पोटात जुळे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00