चेन्नई : तमिळनाडूच्या एका फटाका कारखान्यात स्फोट होऊन सहा कामगार होरपळले. त्यात सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. रसायने मिसळण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाल्याचा संशय आहे. विरुधुनगर येथील फटाका उत्पादन युनिटमध्ये शनिवारी हा स्फोट झाला. ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली. (Explosion)
या स्फोटामुळे किमान कारखान्यातील एक खोली भुईसपाट झाली. रसायने मिसळण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाल्याचा संशय आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन आणि बचाव विभाग घटनास्थळी पोहोचला आहे. (Explosion)
दुसऱ्या एका घटनेत कोईम्बतूरमध्ये एलपीजी टँकर उलटला. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. पाठोपाठ गॅस गळती सुरू झाली, असे कोईम्बतूरचे जिल्हाधिकारी क्रांती कुमार पती यांनी सांगितले.