जमीर काझी : मुंबई : “अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घालून देण्यासाठी एपस्टिननं मध्यस्थी केली होती,” असा खळबळजनक दावा काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केला. “बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील एपस्टीनचे पंतप्रधान मोदींशी नक्की नाते काय? ” असा सवाल देखील त्यांनी केंद्र सरकारला केला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Epstein’s mediation to arrange a meeting with Modi)
अमेरिकेतील बाल लैंगिक शोषण प्रकरणातील एपस्टीन फाईल्स शनिवारी सार्वजनिक झाल्या आहेत. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद एपस्टीनच्या ई-मेल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण पुढं म्हणाले की, “अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी ‘मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचे आहे,’ अशी विनंती एपस्टीनला मेलद्वारे केली. त्यावर एपस्टीननं, ‘तुमची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो,’ असं उत्तर दिलं. त्यानंतर काही दिवसांनी एपस्टीननं बॅनन यांना पुन्हा मेल करून ‘मोदी भेटायला तयार असल्याचं कळवलं होते. (Epstein’s mediation to arrange a meeting with Modi)
एपस्टीन फाईल्सच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या बाबींवर बोट ठेवत चव्हाण यांनी मोदी सरकारला सवाल केले आहेत. “जेफ्री एपस्टीन हा बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता. अशा व्यक्तीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नक्की नातं काय? एका सेक्स स्कँडलमधील आरोपी भारताच्या पंतप्रधानांची अपॉइंटमेंट कशी काय ठरवू शकतो? या प्रश्नांची उत्तरं सरकारनं जनतेला द्यावीत,” अशी मागणी त्यांनी केली. (Epstein’s mediation to arrange a meeting with Modi)
एपस्टीन फाईल्समध्ये पुरी आणि अंबानींचं नाव ,,,पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय या फाईल्समध्ये इतरही भारतीय दिग्गजांची नावं असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामध्ये “केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव एका ई-मेलमध्ये आढळलं आहे. तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांचे नाव या कागदपत्रांमध्ये असून अमेरिकेत राहणाऱ्या एका बड्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचाही यात समावेश आहे. असा दावाही त्यांनी केला.