Home » Blog » निवडणुक आयोगाकडून  इव्हीएमची  पडताळणी करण्यास टाळाटाळ : नसीम खान

निवडणुक आयोगाकडून  इव्हीएमची  पडताळणी करण्यास टाळाटाळ : नसीम खान

by प्रतिनिधी
0 comments
Election Commission evades verification of EVMs

 जमीर काझी : मुंबई : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुक आयोग चांदिवली विधानसभा मतदार संघात ईव्हीएम   पडताळणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून त्यांनी  न्यायालयाच्या सूचनाची अंमलाबजावणी न केल्यास त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा  काँग्रेसचे माजी मंत्री व याचिकाकर्ते नसीम खान यांनी गुरुवारी  केला. त्याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले. (Election Commission evades verification of EVMs)

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या  मतदारसंघात ईव्हीएम मध्ये घोटळा झाल्याची तक्रार पराभूत  उमेदवार नसीम खान यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर  न्यायालयाने पाच टक्के  ईव्हीएम मशीन तपासणीचे आदेश दिल्याने आजपासून दोन दिवसाची  तपासणी बोरीवली येथे सुरु झाली आहे. मात्र न्यायालयाने डेटा सहित तपासणीचे  आदेश  पाळण्यास  आयोग टाळाटाळ करत आहे.  आयोगाची ‘एसओपी’ सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांना हरताळ फासणारी आहे. असा आरोप करून नसीम खान म्हणाले की, बीयू , व्हीव्हीपीएट फक्त जोडून दाखविण्याचा प्रयत्न निवडणुक आयोगाचे इंजिनिअर करत होते त्याला आमचा विरोध आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला पत्र देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे  पडताळणीची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे. (Election Commission evades verification of EVMs)

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगाचा गैरकारभार, घोटाळे यांचा पर्दाफाश केलेला आहे पण आयोग  विरोधांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. हा फक्त चांदिवली विधानसभा निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर हा लोकशाही आणि निवडणुकांची निष्पक्षता व पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असेही नसीम खान यांनी दिला. (Election Commission evades verification of EVMs)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00