Home » Blog » शिक्षण विभागातील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

शिक्षण विभागातील अधिकारी २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

by प्रतिनिधी
0 comments
Education Department Official Caught Red-Handed Accepting a Bribe of ₹25,000.

कोल्हापूर : प्रतिनिधी : आंतरजिल्हा बदलीवर आलेल्या शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेताना कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातील प्रशासन अधिकारी दगडू चंद्राप्पा कुंभार (वय ५२, रा. वाशी नाका, कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून रंगेहाथ लाच घेताना पकडले. (Education Department Official Caught Red-Handed Accepting a Bribe of ₹25,000.)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. तक्रारदार हे आंतरजिल्हा बदलीवरुन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शाळेत रुजू झाले आहेत. आंतरजिल्हा बदलीबाबत नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारीपूर्वी दगडू कुंभार यांन दहा हजार रुपयांची लाच घेतली. त्यानंतर तक्रारदाराचा थकीत पगार आणि पगाराचा फरक काढण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रार अर्जाची पडताळणी करुन सापळा रचण्यात आला. कुंभार यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेत तडजोड करुन २५ हजार लाचेची मागणी केली आणि रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर सापळा रचून दगडू कंभार याला १५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. (Education Department Official Caught Red-Handed Accepting a Bribe of ₹25,000.)

पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, हेड कॉन्स्टेबल विकास माने, सुधीर पाटील, संगिता गावडे, कृष्णा पाटील, रवींद्र पाटील, प्रशांत दावणे यांनी कारवाई सहभाग घेतला. (Education Department Official Caught Red-Handed Accepting a Bribe of ₹25,000.)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00