नवी दिल्ली : २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणाचे भारताकडे करायच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेने मंजुरी दिली. मात्र त्याला भारतात आणायचे काम अत्यंत जोखमीचे होते. भारतातील तपास यंत्रणा आणि अमेरिकेच्या सहकार्याने ही मोहीम गुरुवारी (१० एप्रिल) फत्ते करण्यात आली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचे बळी गेले होते. जगाला हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्याच्या सूत्रधाराला गुरुवारी अमेरिकेहून विशेष विमानाने आल्यानंतर ‘एनआयए’ने अटक केली. (Dummy code for plane)
मूळ पाकिस्तानी असलेल्या या कॅनेडियन दहशतवाद्याला विशेष एनआयए न्यायाधीश चंदरजीत सिंग यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याला २० दिवसांच्या रिमांड देण्याची मागणी एनआयएचे विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी इन-कॅमेरा सुनावणीवेळी केली. राणाच्यावतीने पीयूष सचदेव यांनी बाजू मांडली. दिल्ली विधि सेवा प्राधिकरणाने त्यांची नियुक्ती केली आहे. न्यायालयाने राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. (Dummy code for plane)
जोखमीची मोहीम
राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया अत्यंत जोखमीची मोहीम होती. कारण विमान पालम विमानतळाच्या तांत्रिक क्षेत्रात उतरेपर्यंत हल्ल्याचा धोका होता. त्यामुळे गृह मंत्रालय आणि एनएसए कार्यालय, गुप्तचर विभाग राणाला घेऊन येणाऱ्या विमानावर सतत लक्ष ठेवून होते. भारतीय एजन्सींच्या ताब्यात राणा जाणार नाही, यासाठी हल्ल्याची शक्यता हाणून पाडण्याची सर्व ती खबरदारी घेण्यात आली होती.
विमानासाठी तयार केला डमी कोड
तहव्वुर हुसेन राणाचे प्रत्यार्पण करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्यात आली. विमानाचे उड्डाण आणि प्रवासाचा मार्ग ट्रॅक होऊ नये, तसेच हल्ला होऊ नये, यासाठी गल्फस्ट्रीम जी ५५० या चार्टर्ड विमानासाठी एक डमी कोड तयार करण्यात आला होता. याच विमानाने त्याला भारतात घेऊन येण्यात येत होते. बुधवारी पहाटे लॉस एंजेलिसहून विमानाने उड्डाण केले. रोमानियामध्ये काही वेळ थांबल्यानंतर त्यांचा भारताकडे प्रवास सुरू झाले. अखेर गुरुवारी, १० एप्रिलला ते दिल्लीत उतरले. (Dummy code for plane)
राणा, त्याचा जवळचा शालेय मित्र आणि सहकारी जिहादी दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड कोलमन हेडलीसह १९ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईहून निघाला होता. त्याच्या फक्त एक आठवडा आधी लष्कर-ए-तोयबाच्या जिहादी दहशतवाद्यांची एक टोळी वरळी किनाऱ्यावर हल्ला करण्यासाठी उतरली होती. या हल्ल्यात १६६ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. या हल्ल्याची योजना राणा आणि हेडली या दोघांनी आखली होती. (Dummy code for plane)
२००८ मध्ये मुंबईतील पवई हॉटेलमध्ये थांबला होता. यादरम्यान त्याने आग्रा, हापूर, कोची आणि इतर शहरांनाही भेट दिली होती. दरम्यान, लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संघटनांसाठी दीर्घकाळापासून महत्त्वाची भूमिका बजावत होता. त्याला विमानतळावर अटक करण्यात आली. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. २० वाहनांच्या ताफ्यात आणि कमांडोच्या कडक सुरक्षेत ग्रीन कॉरिडॉरमधून त्याला न्यायालयात नेण्यात आले.
हेही वाचा :
राणाला बिहार निवडणुकीपूर्वी फाशी देतील
बंदुकीच्या धाकावर कधीही वाटाघाटी करणार नाही