Home » Blog » Drainage scam : महापालिका आयुक्तांचा दणका, कनिष्ठ अभियंतासह तिघे निलंबित

Drainage scam : महापालिका आयुक्तांचा दणका, कनिष्ठ अभियंतासह तिघे निलंबित

by प्रतिनिधी
0 comments
Drainage scam

कोल्हापूर : प्रतिनिधी : कसबा बावडा येथील ८५ लाख रुपये ड्रेनेज घोटाळाप्रकरणी महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी अक्शन मोडवर आल्या आहेत. त्यांनी  कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट बळवंत सुर्यवंशी व वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना निलंबित केले आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे. (Drainage scam)

मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ व वरिष्ठ लेखापरिक्षक सुनिल चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता रमेश कांबळे व कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (Drainage scam)

कसबा बावडा येथील जाधव घर ते रेणुसे, रेडेकर, बडबडे मळा पर्यंत ड्रेनेज  पाईप टाकणे या विकास कामाचे काम न करता बिले काढलेबाबत आज मंगळवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंटंट तथा सहाय्यक अधिक्षक बळवंत सुर्यवंशी व वरिष्ठ लिपीक जयश्री हंकारे यांना निलंबीत केले आहे. तर महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ व वरिष्ठ लेखापरिक्षक सुनिल चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यास मान्यता देण्यात आली. तर सेवानिवृत्त शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सेवानिवृत्त उप-शहर अभियंता रमेश कांबळे व पवडी अकौंट सेवानिवृत्त कनिष्ठ लिपीक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

                या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे. या चौकशी समितीला शनिवारी या सर्व प्रकरणाचा अहवाल सात दिवसाचे आत देण्याचे निर्देश दिले होते. परंतु प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज या चौकशी समितीला ४८ तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये जे जे अधिकारी व कर्मचारी कागदपत्राच्या व पुराव्याच्या आधारे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. (Drainage scam)

महानगरपालिकेतील माजी नगरसेवक सत्यजीत कदम आणि माजी महापौर सुनील कदम यांनी या प्रकारणाचा भांडाफोड केला. त्यानंतर महानगरपालिकेने ठेकेदारांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फौजदारी दाखल केली आहे. पण या प्रकरणात अधिकारी कर्मचारीही दोषी असल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीची तयारी सुरू असून महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून दोषींवर कारवाईसाठी वेगवान पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत.

हस्ताक्षरतज्ज्ञांकडून सह्यांची तपासणी करा

ठेकेदाराने खोट्या सह्या करुन बिले उचलल्याचा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ड्रेनेज कामावरील एमबीवर आपल्या सह्या नाहीत असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. महानगरपालिका चौकशी समितीने खोट्या सह्यांची तपासणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांची मदत घेतली तर या प्रकरणाचा साक्षमोक्ष लागू शकतो. त्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून सह्यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00