मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा गुरुवारी मेलबर्न विमानतळावर एका प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी हुज्जत घालताना दिसला. मला न विचारता तुम्ही व्हिडिओ चित्रित करू शकत नाही, असे विराटने संबंधित प्रतिनिधीला सांगितले. (Virat Kohli)
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथी कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघाचे गुरुवारी मेलबर्नमध्ये आगमन झाले. भारतीय संघ विमानतळाबाहेर येत असताना, ‘चॅनेल सेव्हन’ या माध्यमसमुहाची एक महिला प्रतिनिधी विराटचा व्हिडिओ चित्रित करत होती. हे विराटच्या लक्षात येताच त्याने संबंधित प्रतिनिधीजवळ जाऊन तिला खडे बोल सुनावले. त्यानंतर विराट बाहेर जाऊ लागला. परंतु, क्षणार्धात वळून त्याने अन्य प्रसारमाध्यम प्रतिनिधींना उद्देशून, ‘मला विचारल्याशिवाय तुम्ही माझ्या कुटुंबियांचे व्हिडिओ घेऊ शकत नाही,’ असे सांगितले. आपल्या मुलांचे चित्रिकरण केले जाणार नसल्याची खात्री मिळाल्यानंतर कोहली तिथून बाहेर पडला.
दरम्यान, चॅनेल सेव्हन समुहानेही याविषयी स्पष्टीकरण दिले असून विराटची प्रतिक्रिया गैरसमजातून आल्याचे म्हटले आहे. ‘कॅमेरा हातात धरून’ प्रतिनिधी भारतीय संघाची वाट पाहत होते. त्यावेळी ते विराटच्या मुलांचे चित्रिकरण करत असल्याचा विराटचा गैरसमज झाला,’ असे चॅनेल सेव्हनने म्हटले. ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मेलबर्न कसोटीस २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. (Virat Kohli)
Virat Kohli! pic.twitter.com/jM2zyJCXP8
— RVCJ Media (@RVCJ_FB) December 19, 2024
हेही वाचा :
- Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळवून देण्यासाठी २० टक्के निर्यातशुल्क हटवा
- बांगडी बहाद्दर पैलवान पी.जी. पाटील यांचे निधन
- राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी निवड