नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाचा २६ जागांच्या फरकाने पराभव केला, परंतु दोन्ही पक्षांमधील मतांच्या टक्केवारीतील फरक केवळ २.०६ टक्के इतकाच आहे. भाजपने ४५.६१% मते घेत ४८ जागांवर विजय मिळवला. आपने ४३.५५% मते मिळवली. तरीही त्यांना केवळ २२ जागाच मिळाल्या.(delhi vote share)
२०२० मध्ये भाजपला केवळ ८ जागा मिळाल्या होत्या. हा आकडा तब्बल ४० नी वाढला. भाजपने जिंकलेल्या जागा लक्षात घेता ती लक्षणीय कामगिरी ठरते. मात्र त्यांच्या मतांची टक्केवारी ७.१ टक्क्यांनी वाढली.
त्याचप्रमाणे, ‘आप’ला २०२० च्या निवडणुकीत मिळालेल्या ५३.५७ % मते मिळाली होती. मात्र ती १०.०२ टक्क्यांनी घसरली. या पक्षाच्या जागाही ६२ वरून २२ पर्यंत घसरल्या. भाजपचे १४ उमेदवार २०,००० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. ‘आप’चे असे केवळ आठ उमेदवार एवढे मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. (delhi vote share)
दुसरीकडे काँग्रेसलाही सातत्याने फटका बसत आहे. काँग्रेसचा मतटक्का २०१३ मध्ये २४.५५% होता. तो २०१५ मध्ये ९.६५% आणि २०१९ मध्ये ४.२६% पर्यंत घसरला. या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या मतांची टक्केवारी २.०९ टक्क्यांनी वाढून ६.३५% झाली.
राज्यात गेल्या काही वर्षांत आपले मताधिक्य भाजपने हळूहळू वाढवले आहे. तसा हा एकमेव पक्ष ठरला आहे. २०१३ मध्ये, जेव्हा भाजपने ३२ जागा जिंकल्या होत्या, तेव्हा त्यांची मते ३३.०७% होती. २०१५च्या सुमारास साधारण तेवढीच म्हणजे ३२.१९% च्या आसपास होती, परंतु त्याच्या जागा तीनपर्यंत घसरल्या. (delhi vote share)
२०२० मध्ये, भाजपच्या मतांच्या टक्केवारीत सुमारे ६ टक्के वाढ झाली होती, परंतु त्यांच्या जागांची संख्या आठ झाली.
या निवडणुकीत, भाजपच्या मतांची टक्केवारी केवळ ७.१ टक्क्यांनी वाढली असली तरी म्हणजे ३८.५१% वरून ४५.६१% तरी या फरकाने भाजपला दिल्लीत आणखी ४० जागा मिळवून दिल्या. त्याची परिणती ‘आप’ची १० वर्षांची सत्ता उलथवण्यात झाली.
हेही वाचा :