नवी दिल्ली : नवी दिल्लीला प्रदूषित हवेबरोबरच दाट धुक्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीतील दाट धुक्यामुळे दृश्यमानता शून्यावर आली आहे. विमानांची १९ उड्डाणे अन्यत्र वळवण्यात आली. दोनशेवर उड्डाणांचा खोळंबा झाला असून, विमानतळावर विमाने थांबवून ठेवण्यात आली आहेत. रेल्वेवाहतुकीवरही विपरीत परिणाम झाला असून, ८१ रेल्वेगाड्यांना फटका बसला आहे. दुसरीकडे हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ झाली आहे. (Delhi Pollution)
शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर तब्बल १९ उड्डाणे वळवण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी दाट धुक्यामुळे कामकाजावर परिणाम झाला. दोनशेहून अधिक उड्डाणांना कमी दृश्यमानतेमुळे विलंब झाला. दृश्यमानतेमुळे सर्वांत मोठी एअरलाइन असलेल्या इंडिगोने पहाटे आगमन आणि निर्गमन तात्पुरते स्थगित ठेवले होते.(Delhi Pollution)
एका अधिकाऱ्याने सांगितले की दृश्यमानता कमी झाल्यामुळे रात्री सव्वा बारा ते दीड दरम्यान १९ उड्डाणे अन्य विमानतळावर वळवण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीवरील दाट धुक्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्यावर आली. त्यामुळे ८१ रेल्वेगाड्या उशीरा धावत होत्या.(Delhi Pollution)
‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, ८० हून अधिक गाड्यांना उशीर झाला. वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेस १४ तास उशिरा धावली आणि नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस चार तासांपेक्षा जास्त उशीराने धावली. याशिवाय दिल्लीतील दाट धुक्यामुळे ५१ उड्डाणांवरही परिणाम झाला.
दिल्ली विमानतळ प्रशासनाने विमाने उशीरा उतरणार असल्याबद्दल किंवा ती अन्यत्र वळवण्यात आल्याबद्दल सूचना देण्यात आल्या. तसेच संभाव्य विलंबाबद्दलही माहिती देण्यात आली. तसेच एअरलाइन्सच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले जात होते.
वायू गुणवत्ता निर्देशांक ३८३ वर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालानुसार, दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता ‘खूप वाईट’ झाली आहे. येथील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) शनिवारी ३८३ वर आहे. शनिवारी सकाळी शहरात ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दाट धुके आणि कडक थंडीतच दिल्लीकर जागे झाले. त्यातही धुक्यामुळे सर्वत्र अंधारच पसरल्यासारखी स्थिती होती. त्यामुळे प्रवासी वाहतुकीवरही विपरीत परिणाम झाला.
Poor visibility due to dense fog is impacting flight operations in Delhi and parts of Northern India. Please check your flight status at: https://t.co/6ajUZVeeIM before heading to the airport.
— Air India (@airindia) January 3, 2025
हेही वाचा :
केजरीवाल विरोधात परवेश शर्मा
वाघ पोहोचला स्वयंपाकघरात