Home » Blog » Criticism on Udayanraje: उदयनराजेंवर टीकेची झोड

Criticism on Udayanraje: उदयनराजेंवर टीकेची झोड

महात्मा फुले यांच्याविषयी काढलेल्या वक्तव्याचा निषेध

by प्रतिनिधी
0 comments
Criticism of Udayanraje

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलींच्या शाळेच्या संकल्पनेविषयी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे. उदयनराजे यांनी खासदारपदाला शोभतील अशी वक्तव्ये करावीत, उदयनराजेंनी महात्मा फुलेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका करण्यात आली. (Criticism on Udayanraje)

महात्मा जोतीराव फुले यांची जयंती शुक्रवारी (११ एप्रिल) राज्यभरात साजरी करण्यात आली. पुण्यातील फुले वाड्यातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अनेक नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Criticism on Udayanraje)

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही फुले वाड्यात उपस्थिती लावून महात्मा फुले यांना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा, सर्वधर्म समभावाचा विचार जोतीराव फुलेंनी लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांनी मुलींची शाळा काढत असताना एकप्रकारे थोरले प्रतापसिंह यांचे अनुकरण केले. असे विधान उदयनराजे भोसले यांनी केले.

बेजबाबदार वक्तव्ये : प्रा. हाके

उदयनराजेंचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे, असे सांगून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले, उदयनराजे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. कुठलाही अभ्यास न करता किंवा इतिहास तज्ज्ञाचा सल्ला न घेता लोकसभेच्या खासदाराने अशी बेजबाबदार विधाने करू नयेत, असे आमचे मत आहे. महात्मा जोतीराव फुलेंची आज जयंती असताना खासदार इतके बेजबाबदार कसे काय वागू शकतात? याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. (Criticism on Udayanraje)

इतिहासाशी खोडसाळपणा : सपकाळ

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत उदयनराजेंच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा फुले यांचे देशाला अनन्यसाधारण योगदान आहे. पण इतिहासाशी विनाकारण खोडसाळपणे छेडछाड करण्यात येत आहे. उद्या उठून कुणी म्हणेल की, पुराणातील गार्गी नावाची महिला आधीच शिक्षिका झाली होती.

इतिहासाला धक्का देण्याचा प्रयत्न
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनीही उदयनराजे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आज फुलेंची जयंती असताना उदयनराजेंनी येथे येऊन त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःच्या पूर्वजांचे महत्त्व सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला पोवाडा फुलेंनीच लिहिला होता. मात्र उदयनराजे नवा ऐतिहासिक शोध लावून महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासाला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा :
वाघ्याचं काय घेऊन बसलाय, द्या दणका!
कोरटकरची कारागृहातून सुटका

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00