Home » Blog » अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

by प्रतिनिधी
0 comments
Committee for aircraft accident investigation

नवी दिल्ली : अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तीन सदस्यांची समिती स्थापना केली आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. एएआयबी पथकाबेराबरच, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे सदस्यांचे पथक अपघाताच्या दिवशी दुर्घटना स्थळावर दाखल झाले. एएआयबीचे डायरेक्टर जनरल यांनीही घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. (Committee for aircraft accident investigation)

विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. मंत्रालयाने ‘एक्स’वर पोस्ट केली असून या अपघाताची सखोल, पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण चौकशी केली जाईल याची काळजी घेणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ब्लॅक बॉक्समध्ये कॉकपिट व्हाईट रेकॉर्डर, फ्लाईट डेटा रेकॉर्डर याचा समावेश आहे. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून विमानाच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमके काय झाले याचे विश्लेषण केले जाणार आहे. (Committee for aircraft accident investigation)

तपास अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की अपघाताच्यावेळी दृश्यमानतेची स्थिती, वैमानिकाने घेतलेले निर्णय आणि बारामती येथील अनियंत्रित धावपट्टीवरील ऑपरेशनल लिमिटेशन्स चौकशीसाठी महत्वाचे मुद्दे असणार आहेत. (Committee for aircraft accident investigation)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00