Home » Blog » CJI pays homage at Shahu Samadhi Sthal : सरन्यायाधीश गवई यांच्याकडून राजर्षी शाहू समाधीस्थळावर अभिवादन

CJI pays homage at Shahu Samadhi Sthal : सरन्यायाधीश गवई यांच्याकडून राजर्षी शाहू समाधीस्थळावर अभिवादन

by प्रतिनिधी
0 comments
CJ Gavai visits Shahu Samadhi Sthal

कोल्हापूर  : प्रतिनिधी : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज शनिवारी कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. तसेच समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला. तत्पुर्वी सरन्यायाधीश गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत करण्यात आले. उद्या रविवारी (दि.१७) कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. (CJI pays homage at Shahu Samadhi Sthal)

या वेळी शाहू महाराज छत्रपती, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी, न्यायालयीन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. (CJI pays homage at Shahu Samadhi Sthal)

 राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या कार्यातून आजच्या न्यायव्यवस्थेलाही प्रेरणा मिळते. शाहू महाराजांचे न्यायप्रक्रियेतील योगदान ‘सर्वांना समान न्याय’ या तत्त्वावर आधारित होते. त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक भेदभाव दूर करून न्यायव्यवस्थेला अधिक समावेशक आणि मानवीय बनवले. त्यांचे हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना प्रेरणा देणारे ठरले आणि आजही सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात दिशादर्शक आहे. (CJI pays homage at Shahu Samadhi Sthal)

तत्पुर्वी  सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज सायंकाळी कोल्हापूर विमानतळावर सहा वाजता आगमन झाले. त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले.. कोल्हापूर सर्किट बेंच साठी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक,न्यायमूर्ती शिवकुमार दिगे,न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी त्यांचे प्रथम स्वागत केले.  त्यानंतर त्यांचे खासदार शाहू महाराज छत्रपती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे ग्राहक तक्रार निवारण आयुक्तालयाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, विनय कोरे, अमल महाडिक, अशोकराव माने, राहुल आवाडे, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.

 ताराराणी चौकामध्येही कोल्हापूर जनेतकडून फुलांची उधळून करुन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील, विजय देवणे, व्ही.बी.पाटील, आर.के. पोवार यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00