Home » Blog » Modi attacks Pak : पहलगामची घटना इन्सानियतवरील हल्ला : मोदी

Modi attacks Pak : पहलगामची घटना इन्सानियतवरील हल्ला : मोदी

by प्रतिनिधी
0 comments
Modi attacks Pak

श्रीनगर : जगातील सर्वांत उंच आर्च ब्रिज म्हणून ओळख असलेल्या जम्मू काश्मीरमधील चिनाब पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. पहलगामची घटना इन्सानियत आणि काश्मिरीयतवर झालेला हल्ला होता. पण जेव्हा जेव्हा पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल तेव्हा त्याला त्याच्या लज्जास्पद पराभवाची आठवण येईल, असे पंतप्रधान मोदी यावेळी आयोजित केलेल्या सभेवेळी म्हणाले.
प्रवासी आणि लष्कराच्या दृष्टीने जम्मू आणि काश्मीरला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. यावेळी काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. (Modi attacks Pak)
भारत दहशतवादासमोर झुकणार नाही; जम्मू-काश्मीरमधील तरुण या लढाईत एकजूट आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले
चिनाब पुलाचे उद्घाटन आणि वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कटरा येथे एका सभेला संबोधित केले.
सभेत बोलताना श्री. मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर या विषयावर भाष्य केले. ते म्हणाले, “पाकिस्तान मानवता, पर्यटन, काश्मिरींच्या ‘रोटी-रोटी’च्या विरोधात आहे आणि म्हणूनच पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला.”(Modi attacks Pak)
श्री. मोदी म्हणाले, “पहलगामची घटना ही ‘इन्सानियत आणि काश्मिरीयत’वर हल्ला होता; भारतात दंगली घडवण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ला हा काश्मिरींचे उत्पन्न रोखण्याचा पाकिस्तानचा कट होता.”
श्री मोदी पुढे म्हणाले की, “पाकिस्तानच्या गोळीबारात ज्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना सरकारने अतिरिक्त २ लाख रुपये आणि अंशतः नुकसान झालेल्यांना १ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.”

पुलाची वैशिष्ट्ये

चिनाब नदीपासून ३५९ मीटर उंचीवर हा पूल असून तो आयफल टॉवरच्या उंचीला मागे टाकणारा जगातील सर्वांत उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. पुलाची लांबी १३१५ मीटर असून तीव्र भूकंपाचा धक्का आणि २६६ किलोमीटर ताशी वेगाने वारा सहन करण्याची क्षमता या पुलामध्ये आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार साहित्याचा वापर करुन हा पूल बांधला आहे. (Modi attacks Pak)

पंतप्रधान मोदी यांनी यूएसबीआरएल प्रकल्पावरील प्रदर्शनाला भेट दिली. तसेच उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग (यूएसबीआरएल) प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांशीही संवाद साधला. यूएसबीआरएल रेल्वे मार्ग हा २७२ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून त्यामध्ये ३६ बोगदे, ९४३ पूल आहे. यासाठी ४३ हजार ७८० कोटी रुपये खर्च आला आहे. सात जूनपासून हा रेल्वे मार्ग खुला होणार आहे. या मार्गावरुन दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी उधमपूर आणि रियासी जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00