Home » Blog » China Fact : रूग्णालयात डांबले, शॉक दिले…

China Fact : रूग्णालयात डांबले, शॉक दिले…

चीनने आपल्याच लोकांना का छळले?

by प्रतिनिधी
0 comments
China Fact

वॉशिंग्टन : त्यांनी मला बेडला बांधले. स्क्रिझोफ्रेनिया आजारासाठी दिली जाणारी ट्रिटमेंट दिली. सुरुवातीला सांगितले, मी कोविड सेंटरमध्ये आहे, प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये होतो. ‘डॉक्टरांनी सांगितले की मला खूप गंभीर मानसिक आजार आहे… मग त्यांनी एका बेडवर बांधले. नर्स आणि डॉक्टरांनी वारंवार सांगितले की, माझ्या राजकीय पक्ष आणि सरकारबद्दलच्या मतांमुळेच हे सगळं होतंय… हे भयानक होते. १२ दिवस तिथे होतो… चीनमधल्या झांग जुंजीचा हा दाहक अनुभव.  झांगसोबत हा प्रकार घडला तेव्हा तो केवळ १७ वर्षांचा होता… (China Fact)

कोविडने जगाला महामारी काय असते हे दाखवले. सगळ्या जगाला छळणाऱ्या कोविड १९ या आजाराने कित्येक चिनी नागरिकांनाही आयुष्यातून उठवले. हुकूमशाही यंत्रणांनी लोकांचे आवाज दाबले. चीनमधल्या काही लोकांनी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला. त्यासाठी त्यांनी जबर शिक्षा भोगली… यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट ‘बीबीसी’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे. (China Fact)

झांग जुंजी सांगतो, लॉकडाउनविषयी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निदर्शने करत होतो. त्यावेळी आमच्या प्राध्यापकांनी पाहिले, माझ्या वडिलांशी संपर्क साधला. घरी नेले. दुसऱ्या दिवशी त्याचा १८ वा वाढदिवस. दोघे आले. त्यांनी कोविड चाचणी केंद्रात आणले असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात ते हॉस्पिटल होते. जुंजीची शिक्षा येथेच संपत नाही, त्याचा छळवाद अजून बाकी होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर महिन्यानंतर जुंजीला पुन्हा पोलिसांनी अटक केली. (China Fact)

कुणीतरी बंदी असलेले फटाके उडवतानाचा व्हिडिओ अपलोड केला. तो जुंजीच आहे असा आळ घालून त्याला अटक करण्यात आली. पुन्हा त्याला दोन महिने जबरदस्ती रुग्णालयात दाखल केले. डिस्चार्ज देताना त्याला मनोविकारावरील औषधे देण्यात आली. धक्कादायक म्हणजे औषधे घेतोय की नाही हे पाहण्यासाठी पोलीस त्याच्या घरी येत. शेवटी कंटाळून जुंजीने चीन सोडले. तो न्यूझिलंडला गेला. (China Fact)

बीबीसीच्या स्पेशल रिपोर्टनुसार, चीनमधील मेंटल हेल्थ हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती दाखल केलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे, असं एका ज्येष्ठ वकिलाने सांगितले.

जी लिजियानची गोष्टही अशीच आहे. त्यालाही जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले होते. जी लिजियान सामाजिक कार्यकर्ता आहे. पगारवाढीसाठी फॅक्टरीविरोधात केलेल्या आंदोलनानंतर मला अटक केल्याचे जी सांगतो. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जीने औषधे नाकारली तेव्हा त्याला मारहाण करण्यात आली. शॉक ट्रिटमेंट देण्यात आली. औषधोपचार आणि शॉक ट्रीटमेंटमुळे भयंकर त्रास होत होता. वाटायचं की आता मरतोय.. जीसुद्धा या जीवघेण्या त्रासापासून सुटला तो ५२ दिवसांनी. तो सध्या लॉस एंजेलिसमध्ये पार्ट टाईम नोकरी करतो. त्यालाही मायदेशापासून मुकावे लागले. (China Fact)

सरकारविरोधात सोशल मीडियावर  कमेंट पोस्ट केल्याबद्दलही कित्येकांना रुग्णालयात डांबून ठेवण्यात येत असल्याची माहितीही या रिपोर्टमध्ये आहे.

(सौजन्य : बीबीसी)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00