Home » Blog » Fake ‘Ladki Bahin’: बांगलादेशी ‘लाडकी बहीण!

Fake ‘Ladki Bahin’: बांगलादेशी ‘लाडकी बहीण!

मुंबई पोलिसांकडून अटक

by प्रतिनिधी
0 comments
Fake ‘Ladki Bahin’

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेत चक्क एक बांगलादेशी महिला लाभार्थी बनल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांमध्ये या लाभार्थी लाडकी बहिणीचा समावेश आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची योग्य शहानिशा केली नसल्याचे उघड झाले आहे. (Fake ‘Ladki Bahin’)

क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू)ने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल कामठीपुरा येथून पाच बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक केली आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यामध्ये २३ वर्षीय उर्मिला खातुन हिचा समावेश  होता. तिने बनावट आधार कार्ड बनविले आहे. तिच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा झाले असल्याचे तपासातून स्पष्ट झाले.(Fake ‘Ladki Bahin’)

शिंदे सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. यात नियम, अटी असताना अनेक महिला याचा फायदा घेत आहे. यात अवैधरित्या राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेने मुंबईत लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू) ने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल कामठीपुरा येथून महादेव यादव (वय ३४) या दलालासह ५ जणांना अटक केली. (Fake ‘Ladki Bahin’)

पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एक २३ वर्षीय उर्मिला खातुन हिला गेल्यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळाले होते. पोलिसांनी तिचे आधार कार्ड बनावट असल्याचे म्हटले आहे. मात्र तिचे वकील सुनील पांडे यांनी मात्र तिच्याकडे आधार कार्ड असून अन्य कागदपत्राच्या तपासणीनंतर तिला लाडकी बहीण योजनेचे फायदे मिळाले आहेत. त्यामुळे ती भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा :
२० फेब्रुवारीआधी आमचे सिझेरियन करा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00