बेंगळुरू : ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन यांनी सोमवारी (२ जून) कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) ने त्यांच्या आगामी ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यापासून संबंधितांना रोखण्यात यावे, अशी विनंती कमल हसन यांनी केली आहे. (KFCC bans Thug Life)
कमल हसन यांनी कन्नड भाषेवर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हासन यांनी त्यांच्या राजकमल फिल्म इंटरनॅशनलच्या सीईओ मार्फत ही याचिका दाखल केली आहे.
कर्नाटक सरकार, पोलिस विभाग आणि फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स यांना चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केली आहे. शिवाय, त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी योग्य सुरक्षेची मागणीही केली आहे. (KFCC bans Thug Life
गेल्या महिन्यात ‘ठग लाईफ’च्या प्रमोशनल कार्यक्रमादरम्यान कमल हासन यांनी ‘‘कन्नडचा जन्म तामिळ भाषेतून झाला आहे,’’असे विधान गेले. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
या वक्तव्यामुळे कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला होता. राजकीय नेते आणि चित्रपट संघटनांनी कमल हासन यांच्यावर टीकाही केली होती. कर्नाटक भाजपचे प्रमुख बी. वाय. विजयेंद्र यांनी हासन यांना माफी मागण्याचे आवाहन केले होते.
‘‘मातृभाषेवर प्रेम करायला हवे, परंतु तिच्या नावावर अहंकार दाखवणे हे सांस्कृतिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. विशेषतः कलाकारांनी, प्रत्येक भाषेचा आदर करण्याची नीतिमत्ता बाळगणे आवश्यक आहे,’’ असे विजयेंद्र यांनी ‘एक्स’ वर म्हटले आहे.
कमल हासन यांची भूमिका
हासन यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्यानंतर स्वत: भूमिका स्पष्ट केली होती. राजकारणी ‘‘भाषेबद्दल बोलण्यास पात्र नाहीत.’’ (KFCC bans Thug Life) ‘‘मला वाटते की मी जे बोललो ते कन्नडच्या प्रेमापोटी. अनेक इतिहाससंशोधकांच्या अभ्यासाच्या आधारे बोललो. ज्यांनी मला भाषा, इतिहास शिकवला त्यांच्या आधारे मी बोललो. यात मला दुसरे काहीही म्हणायचे नव्हते. राजकारणी भाषेबद्दल बोलण्यास पात्र नाहीत. त्यांचे त्यासंबंधीचे पुरेसे शिक्षण असत नाही. त्यात मीही आहे. म्हणून या सर्व सखोल चर्चा इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भाषा तज्ञांवर सोडूया. आपण एक कुटुंब आहोत आणि एक भाषा देखील आहेत,’’ असे कमल हासन यांनी म्हटल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
हेही वाचा :
भूस्खलनात तीन जवानांचा मृत्यू
विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपीला जन्मठेप