Home » Blog » Iran missile strikes : इराणकडून इस्त्रायलला जोरदार प्रत्युत्तर

Iran missile strikes : इराणकडून इस्त्रायलला जोरदार प्रत्युत्तर

by प्रतिनिधी
0 comments
Iran missile strikes

तेहरान : इस्त्रायलने इराणच्या अणु आणि लष्करी तळावर हल्ले केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला आहे. इराणने या मोहिमेला ‘प्रामाणिक वचन’ असे नाव दिले आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे जोरदार हल्ले केले आहे. इस्त्रायलने इराणची क्षेपणास्त्रे रोखल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात इस्त्रायलचे १० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. इराणच्या सततच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने नागरिकांनी सुरक्षित बंकरचा आश्रय घेतला आहे. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला चढवल्याने मध्य पूर्वेतील तणाव वाढला आहे. (Iran missile strikes)

शुक्रवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर शनिवारी सकाळी इराणने इस्त्रायलवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. प्रामाणिक वचन तीन हल्ल्याचा नवीन टप्पा असे इराणच्या  सरकारी टेलिव्हिजनने वृत्त दिले आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांनी इस्त्रायलच्या हल्ल्याचा बदला घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही तासातच हल्ले झाले आहे. इराणने इस्त्रालयवर रात्रभर प्राणघातक क्षेत्रणास्त्राचा हल्ला केला आहे. इस्त्रायलने इराणच्या हद्दीत खोलवर घुसून इराणमधील अणु सुविधा, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कारखाने आणि प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर हल्ले चढवले. त्यामध्ये इराणचे मोठे नुकसान झाले आहे. लष्करातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ ठार झाले आहेत. त्यानंतर इराणनने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले आहेत. (Iran missile strikes)

इराणनने तेल अवीवच्या मध्यभागी लक्ष्य करुन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अखंडपणे डागली आहेत. या हल्ल्याने तेल अवीव आणि जेरुसलेम स्फोटांनी हादरले. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी नागरिकांना ताबडतोब आश्रय घेण्यास सांगितले. शहरामध्ये जवळजवळ एकाच वेळी होणाऱ्या स्फोटामुळे इमारती हादरल्या. काही हल्ले इस्त्रायलच्या हवाई सरंक्षण यंत्रणेने रोखले असावेत असे मानले जात आहे. मध्य इस्त्रायलमधील एका घराजवळ इराणी क्षेपणास्त्र आदळल्याने दहा नागरिक जखमी झाले.  (Iran missile strikes)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00