नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वत रांगेच्या वादाच्या प्रकरणात स्वत:च्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणात केंद्र आणि राज्यांना नोटीसही बजावली आहे. या प्रकरणाची २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. (Supreme Court grants stay on the Aravalli issue)
अरवली पर्वतरांगेच्या व्याखेवरुन गेले काही दिवस वाद सुरू होता. केंद्र सरकारने शिफारस केलेली अरवली पर्वताची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी स्वीकारली. त्यामुळे १०० मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या भूभागांना अरवली पर्वत मानले जाईल. मग त्याहून कमी उंची असलेल्या भूभागांचे काय? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी नागरिकांकडून उपस्थित केले गेले. या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मिडियावर त्यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या. अखेर या घडामोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत आज सोमवारी २९ रोजी तातडीने सुनावणी घेतली. न्यायालयाने स्वत:च्या निर्णयाला स्थगिती दिली. तसेच या प्रकरणात केंद्र आणि राज्यांना नोटीस बजावली आहे. (Supreme Court grants stay on the Aravalli issue)
अरवली पर्वत रांग चार राज्यात विस्तारली असून निसर्गाच्यादृष्टीने या पर्वत रांगांना महत्व आहे. केंद्र सरकारकडून अरवली पर्वतरांगा नष्ट करण्याचा कट रचल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्या विरोधात आंदोलनही सुरू झाली आहेत. मोजक्या उद्योगपतींच्या फायदा करुन देण्यासाठी हा निर्णय विरोधकांनी केला आहे. (Supreme Court grants stay on the Aravalli issue)