मुंबई : प्रतिनिधी : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत असरानी यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. फुफुसाच्या आजाराने ते त्रस्त होते. चार दिवसापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शोले चित्रपटातील त्यांची जेलरची भूमिका चांगलीच गाजली होती. (Asrani passes away)
आज सोमवारी दुपारी चार वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे मॅनेजर बाबू भाई यांनी दैनिक भास्करशी बोलताना दिली. चार दिवसापूर्वी त्यांना फुफुसाच्या आजाराने त्रस्त असल्याने उपचारास दाखल केले होते. त्यांच्या छातीत पाणी भरले होते. (Asrani passes away)
एक जानेवारी १९४१ मध्ये जयपूरमध्ये त्याचा जन्म झाला. पुण्यातील भारतीय फिल्म अन्ड टेलिव्हिजन त्यांचे शिक्षण झाले. हास्य अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००७ पर्यंत चित्रपटात काम करत होते. भुल भुलैय्यामध्ये त्यांनी भूमिका केली होती. नमक हराम चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना हास्य अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्याच्यासोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या सुपरस्टार ची जोडी होती. गुड्डी, बावर्ची, सीता और गीता, परिचय, पिया का घर, अचानक, अनामिका, अभिमान, शोले, चुपके चुपके, छोटी सी बात, चरस, हेरा फेरी, सरगम यांच्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. (Asrani passes away)
