नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. बैठकीची कोणतीही अधिकृत माहिती उघड करण्यात आली नाही. (MODI-SHAH MEETS PRESIDENT)
राष्ट्रपती भवनाने ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.” तसेच बैठकीचे फोटो देखील दिले आहेत.
त्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली.(MODI-SHAH MEETS PRESIDENT)
राष्ट्रपती भवनातून सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली असून, “केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली,” असे त्यात म्हटले आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात जोरदार वादंग आणि अनेकवेळा तहकूब झाल्यानंतर काही दिवसांतच या बैठका झाल्या. मुख्यत्वे बिहारमधील वादग्रस्त विशेष सखोल सुधारणा (SIR) मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला आहे.(MODI-SHAH MEETS PRESIDENT)
विरोधी इंडिया आघाडी एसआयआरला तीव्र विरोध करत आहे. या मोहिमेतून मतदार मोठ्या प्रमाणात वगळण्याचा डाव असल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे. तथापि, निवडणूक आयोगाने या मोहिमेचा बचाव केला आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट अचूक आणि अद्ययावत मतदार याद्या सुनिश्चित करणे आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
याशिवाय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर २५ टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी भेट झाली. ट्रम्प यांनी त्यांनी भारताची अर्थव्यवस्था “मृत” असल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कर लागू करण्याबद्दल पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी रशियासोबतचा भारताचा व्यापार हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे नमूद केले होते. त्यांनी भारताच्या रशियन ऊर्जेच्या खरेदीशी संबंधित अतिरिक्त दंडांची धमकीही दिली होती.
देश-विदेश
SHIBU SOREN PASSES AWAY: झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन
नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे सोमवारी (४ ऑगस्ट) नवी दिल्ली येथे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. आजारपणामुळे एक महिन्याहून अधिक काळ ते अंथरुणाला खिळून होते. (SHIBU SOREN PASSES AWAY)
झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी निधनाची घोषणा केली. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आदरणीय दिशाम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत.’’ शिबू सोरेन झारखंडमध्ये ‘दिशाम गुरुजी’ म्हणून प्रसिद्ध होते.(SHIBU SOREN PASSES AWAY)
सोरेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. “श्री शिबू सोरेन हे तळागाळातील नेते होते. सार्वजनिक जीवनात काम करत असताना त्यांची जनतेप्रती अढळ निष्ठा होती. आदिवासी समुदाय, गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याबाबत ते विशेषतः उत्साही होते. माझ्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहेत.(SHIBU SOREN PASSES AWAY)
जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोरेन यांना नवी दिल्लीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. किडनीशी संबंधित गुंतागुंतीमुळे शिबू सोरेन यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात एका महिन्यापेक्षा जास्त काळ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीखाली होते.(SHIBU SOREN PASSES AWAY)
११ जानेवारी १९४४ रोजी सध्याच्या झारखंडमधील रामगडजवळ जन्मलेले शिबू सोरेन हे संथाळ आदिवासी समुदायाचे होते. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला आदिवासींच्या जमीन हक्कासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. १९७३ मध्ये बिहारपासून वेगळे आदिवासी राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ची सह-स्थापना केली.
१९८० मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आलेले शिबू सोरेन संसदेत अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. १९८७ मध्ये, ते झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष झाले. जवळपास ३८ वर्षे त्यांनी हे पद भूषवले.
SC SLAMS RAHUL GANDHI : सच्चा भारतीयाला हे शोभत नाही : राहुल गांधी यांना कोर्टाने फटकारले
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (४ ऑगस्ट) स्थगिती दिली.(SC SLAMS RAHUL GANDHI)
त्याचवेळी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने राहुल गांधी यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्ल फटकारले. “तुम्ही विरोधी पक्षनेते आहात; तुम्ही सोशल मीडियावर नव्हे तर संसदेत बोला,.” असे सुनावले.
“२००० चौरस किमी जमीन चिनी लोकांनी व्यापली आहे हे तुम्हाला कसे कळते? सच्चा भारतीयाच्या तोंडी असे वक्तव्य शोभत नाही,” असेही खंडपीठाने म्हटले आहे.(SC SLAMS RAHUL GANDHI)
खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकार आणि या प्रकरणातील तक्रारदाराला नोटीसही बजावली.
२२ डिसेंबर रोजी झालेल्या भारत-चीन संघर्षाबद्दल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय सैन्याची बदनामी झाली आणि त्यांचे मनोबल खच्ची झाले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्य भारतीय सैनिकांना “पिळून टाकत” आहे आणि मीडिया त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
हेही वाचा :
मोदी, शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
…तर संसदेत गायी सोडू : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
Rahul attacks on BJP : भित्र्यांना घाबरायचे नसते हे बाळकडू घरातूनच मिळाले : राहुल गांधी
नवी दिल्ली : माझी बहीण (प्रियंका गांधी) मला नेहमीच ‘तू आगीशी खेळतोयस, तुला भीती वाटत नाही का,’ असे विचारत असते, असे सांगून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी म्हणाले, ‘‘भित्र्यांना घाबरायचे नसते हे बाळकडू आम्हाला घरातूनच मिळाले आहे,’’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजप विरोधात लढण्याचा निर्धार शनिवारी (२ ऑगस्ट) पुन्हा एकदा बोलून दाखवला. (Rahul attacks on BJP)
मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांचा संदर्भ देऊन राहुल गांधी म्हणाले, ‘‘अरूण जेटली आता हयात नाहीत, त्यांच्याबद्दल आता काही बोलू नये. पण मला आठवते की जेव्हा मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो तेव्हा अरुण जेटलीजींना मला धमकी देण्यासाठी पाठवण्यात आले होते. ते म्हणाले होते की, जर तुम्ही शेती कायद्यांबाबत विरोध करत राहिलात तर आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. मी म्हणालो की, मला वाटत नाही की तुम्ही कोणाशी बोलत आहात हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही काँग्रेस आहोत, भित्रे नाही. ब्रिटिश आम्हाला वाकवू शकले नव्हते.’’(Rahul attacks on BJP)
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) कायदा, मानवाधिकार आणि माहिती अधिकार यावरील वार्षिक परिषदेत ते बोलत होते.
तथापि, राहुल गांधी यांचे विधान अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनी खोडून काढले आहे. तशी पोस्टही त्यांनी ‘X’ वर केली आहे.(Rahul attacks on BJP)
“माझ्या वडीलांनी धमकी दिल्याचे राहुल गांधी आता सांगताहेत. मी त्यांना आठवण करून देतो की, माझ्या वडीलांचे निधन २०१९ मध्ये झाले आहे आणि कृषी कायदे २०२० मध्ये लागू करण्यात आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विरोध केल्याबद्दल धमकावणे हे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते. ते एक कट्टर लोकशाहीवादी होते आणि नेहमीच एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवत असत,” असे रोहन जेटली यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
दरम्यान, राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ७० ते १०० जागांवर फेरफार झाल्याचा काँग्रेस पक्षाला संशय आहे, असे ते म्हणाले.
भारतातील निवडणूक व्यवस्था आधीच मृतावस्थेत आहे. तसे पुरावे आमच्याकडे आहेत. गांधी यांनी एका मतदारसंघाचे उदाहरण दिले. येथे ६.५ लाख मतदारांनी मतदान केले होते, त्यापैकी १.५ लाख बोगस होते, असे ते म्हणाले. “भारताचे पंतप्रधान हे खूपच कमी बहुमत असलेले पंतप्रधान आहेत. लोकसभा निवडणुकीत मतांची फेरफार कशा पद्धतीने केली जाऊ शकते हे येत्या काही दिवसांत आम्ही तुम्हाला सिद्ध करुन दाखवणार आहोत.
I remember when I was fighting against the farm laws, Arun Jaitley was sent to threaten me.
— Congress (@INCIndia) August 2, 2025
He said, 'If you continue down this path, opposing the government and fighting us on the farm laws, we'll have to take action against you.'
I replied, 'I think you don't know or have… pic.twitter.com/8s9TJGMPah
Rahul Gandhi now claims my late father, Arun Jaitley, threatened him over the farm laws.
— Rohan Jaitley (@rohanjaitley) August 2, 2025
Let me remind him, my father passed away in 2019. The farm laws were introduced in 2020. More importantly, it was not in my father's nature to threaten anyone over an opposing view. He was a…
Prajwal Revanna Case: माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा
बंगळुरू : जनता दला (धर्मनिरपेक्ष)चा नेता आणि माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला (वय ३४) शनिवारी (२ ऑगस्ट) बलात्कार प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आली आहे. शिवाय त्याला दहा लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. (Prajwal Revanna Case)
रेवण्णा हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. कालच बंगळुरूच्या आमदार / खासदार विशेष न्यायालयाने चार पैकी एका बलात्कार प्रकरणात त्याला दोषी ठरविले होते. आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हसन येथील फार्म हाऊसवरील एका मदतनीस महिलेवर धमकी देऊन सातत्याने बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. (Prajwal Revanna Case)
निकाल जाहीर करण्यापूर्वी, प्रज्वल रेवण्णाला न्यायालयात बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी प्रज्वलने माझ्याविरोधात कट रचल्याचा आरोप केला. ‘‘मी खासदार म्हणून निवडून आलो आहे. या काळात मी चांगले काम केले आहे. मी खासदार असताना कोणीही माझ्यावर बलात्काराचा आरोप केला नाही. परंतु निवडणुकीच्या अगदी आधी हा आरोप करण्यात आला. माझी एकमेव चूक म्हणजे मी राजकारणात वेगाने वाढलो,’’ असे ते म्हणाले.
प्रज्वलला रडू कोसळले
कोर्टाने शिक्षा सुनावताच प्रज्वल रेवण्णाला भर न्यायालयातच रडू कोसळले. विद्यार्थीदशेत मेरिट असलेला विद्यार्थी होतो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर आहे. पालकांना भेटून मला सहा महिने झाले आहेत. कोर्टाने दया दाखवावी आणि मला पालकांना भेटू द्यावे, अशी विनंतीही त्याने न्यायालयात केली. (Prajwal Revanna Case)
Modi in Varanasi: भगवान शिवाच्या आशीर्वादाने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला : मोदी
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२ ऑगस्ट) दहशतवादाविरुद्ध भारताच्या कठोर कारवाईचे वर्णन करताना भगवान शिवाच्या ‘रुद्र रूपा’ चा दाखला दिला. ऑपरेशन सिंदूरने जगासमोर देशाची ताकद दाखवली. भारतावर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, अगदी ‘पाताल लोक’मध्ये गेले तरी सोडणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला, असे मोदी म्हणाले. (Modi in Varanasi)
‘‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या २६ जणांबद्दल माझे हृदय दुःखाने भरून आले आहे,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले.
‘‘आमच्या मुलींच्या ‘सिंदूर’चा बदला घेण्याचे माझे वचन महादेवाच्या आशीर्वादाने पूर्ण झाले,’’ असे ते म्हणाले. ‘‘ऑपरेशन सिंदूरचे यश मी महादेवाच्या चरणी समर्पित करतो. १४० कोटी देशवासीयांची एकता ही ऑपरेशन सिंदूरचे बलस्थान बनली, असेही ते म्हणाले. (Modi in Varanasi)
‘‘शिव म्हणजे कल्याण पण जेव्हा दहशतवाद कुरूप डोके वर काढतो तेव्हा महादेव त्याचे ‘रुद्र रूप’ घेतात. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जगाने भारताचे हे रूप पाहिले,’’ असे पंतप्रधान म्हणाले. (Modi in Varanasi)
विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, देश ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उत्सव साजरा करत असताना, ‘‘आपल्याच देशातील काही लोक यामुळे त्रासले होते. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले हे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना पचवता येत नाही,’’ असे ते म्हणाले.
‘‘ऑपरेशन सिंदूरचा तुम्हाला अभिमान नाही का? भारताने (पाकिस्तानमधील) दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले याचा तुम्हाला अभिमान नाही का?’’ असा प्रश्न पंतप्रधानांनी उपस्थितांना विचारला.
ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी दहशतवादी मुख्यालयांवर अचूक हल्ला करून त्यांचा नाश कसा केला याचे दृश्य तुम्ही सर्वांनी पाहिले असतील.’’ ‘‘पाकिस्तानमधील अनेक हवाई तळ अजूनही आयसीयूमध्ये आहेत. पाकिस्तानची वेदना समजण्यासारखी असली तरी धक्कादायक गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांना हे सहन होत नाही, याचे आश्चर्य वाटते,’’ असे मोदी म्हणाले.
आज अपने संसदीय क्षेत्र वाराणसी से पीएम-किसान सम्मान निधि की राशि जारी कर और काशीवासियों के लिए विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन व शिलान्यास कर अत्यंत प्रसन्नता हो रही है। https://t.co/ezUNEParvT
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2025
Tejaswi alleges EC : मतदार यादीतून माझेच नाव गायब : तेजस्वी यादव; आयोग म्हणतो…
पाटणा : राष्ट्रीय जनता दल (राजद) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी (२ ऑगस्ट) भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित केलेल्या बिहारच्या ‘मतदार यादीच्या मसुद्यात’ त्यांचे नाव गायब झाले असल्याचा दावा केला. मतदारांचे हक्क हिरावून घेत लोकशाहीची हत्या करण्याचे काम येथे सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. (Tejaswi alleges EC)
जवळजवळ ६५ लाख मतदार म्हणजे एकूण मतदार संख्येच्या सुमारे साडे आठ टक्के मतदार वगळण्यात आले आहेत. त्यामुळे कुणाची नावे गायब आहेत हे ओळखणे कठीण झाले आहे, असा दावा यादव यांनी पत्रकार परिषदेत केला. (Tejaswi alleges EC)
त्याआधी, श्री यादव यांनी मोठ्या स्क्रीनवर निवडणूक आयोगाच्या अधिकृत साईटवर नाव शोधण्यासंदर्भातील प्रात्यक्षिक दाखवले. त्यांचा EPIC नंबर टाकून कॅप्चा टाकला. त्यावेळी स्क्रीनवर, ‘रेकॉर्ड सापडत नसल्याचा’ मेसेज दिसला.
पाटणा जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण
यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानंतर पाटणा जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली. या संदर्भात चौकशी केली असता तेजस्वी यादव यांचे नाव मसुदा मतदार यादीत नोंदलेले असल्याचे ते म्हणाले. (Tejaswi alleges EC)
“सध्या, त्यांचे नाव बिहार पशू विज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीतील मतदान केंद्र क्रमांक २०४ वर अनुक्रमांक ४१६ सह सूचीबद्ध आहे. पूर्वी, त्यांचे नाव बिहार पशू विज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीतील मतदान केंद्र क्रमांक १७१ वर अनुक्रमांक ४८१ सह नोंदवले गेले होते,” असा खुलासा जिल्हा प्रशासनाने ‘X’वरील पोस्टमध्ये केला आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडून तेजस्वींच्या दाव्याचे खंडन
दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते सम्राट चौधरी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट टाकून तेजस्वी यादव यांच्या दाव्याचे खंडन केले. यादव यांच्याकडे मतदार यादीतील नाव कसे शोधावे, याचे ज्ञान नाही, त्यांच्याकडे ‘पात्रतेचा अभाव’ असल्याचा आरोप केला. “तुमचे नाव तुमच्या वडिलांच्या नावासोबत आहे, आदरणीय लालू प्रसाद [राजद सुप्रीमो]. फसवे आणि खोटे दावे करणारे तुमचे दुकान तुम्ही बंद केले तर चांगले होईल,” असा टोला श्री. चौधरी यांनी मारला आहे.
मेरा नाम वोटर लिस्ट में नहीं है। हम चुनाव कैसे लड़ेंगे?
— Office of Tejashwi Yadav (@TejashwiOffice) August 2, 2025
ताज्जुब की बात है!- श्री @yadavtejashwi जी।
{EPIC- RAB2916120} pic.twitter.com/HjxS3rTwHX
Film Awards announced : शाहरूख, विक्रांत मॅसी, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट
नवी दिल्ली : बॉलीवूड स्टार शाहरुख खानला अॅक्शन ब्लॉकबस्टर ‘जवान’ मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ मधील तिच्या कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विक्रांत मॅसीला ’१२ वी फेल’ या हिट बायोपिकमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शाहरूख आणि मॅसीला हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ‘श्यामची आई’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Film Awards announced)
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (१ ऑगस्ट) करण्यात आली. २०२३ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि चित्रपटसृष्टीतील कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (आय अँड बी) पुरस्कारांची घोषणा केली.
आयपीएस अधिकारी मनोज कुमार यांच्या कथेवर आधारित, ‘१२ वी फेल’ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. सुदीप्तो सेन यांना त्यांच्या ‘द केरळ स्टोरी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला तर करण जोहर यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ला सर्वोत्कृष्ट मनोरंजनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. (Film Awards announced)
* राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि विजेते असे :
फीचर फिल्म्स, प्रादेशिक चित्रपट
तेलुगू : भगवान् केसरी
तमिळ : पार्किंग
मल्याळम : उल्लोझुक्कु
कन्नड : कंदीलू – द रे ऑफ होप
हिंदी : कथल : अ जॅकफ्रूट मिस्ट्री
गुजराती : वाश
सर्वोत्तम पंजाबी चित्रपट : गॉडडे गॉडडे चा
सर्वोत्तम ओडिया चित्रपट : पुष्करा

सर्वोत्तम मराठी चित्रपट : श्यामची आई
विशेष उल्लेख : पुनर्लेखन : एमआर राजकृष्णन, ‘अॅनिमल’ (हिंदी)
स्टंट नृत्यदिग्दर्शन : नंदू आणि प्रध्वी, हनु-मॅन (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : वैभव मर्चंट, ‘धिंडूर बाजा रे’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (हिंदी)
सर्वोत्कृष्ट गीत : कासरला श्याम, ‘ओरू पलेतुरु’, ‘बालागम’ (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन (गाणी): जी व्ही प्रकाश, ‘वाथी’ (तमिळ)
पार्श्वभूमी स्कोअर : हर्षवर्धन रामेश्वर, ‘प्राणी’ (हिंदी)
मेकअप : श्रीकांत देसाई, ‘साम बहादूर’ (हिंदी)
कॉस्च्युम डिझायनर : सचिन लोवळेकर, दिव्या गंभीर आणि निधी गंभीर, ‘सॅम बहादूर’ (हिंदी)
प्रॉडक्शन डिझाइन : मोहनदास, ‘२०१८ – एव्हरी इज अ हिरो’ (मल्याळम)
संपादन : मिधुन मुरली, पुक्कलम (मल्याळम)
ध्वनी रचना : सचिन सुधाकरन आणि हरिहरन मुरलीधरन, ‘प्राणी’ (हिंदी)
पटकथा : साई राजेश नीलम, ‘बेबी’ (तेलुगु), रामकुमार बालकृष्णन, ‘पार्किंग’ (तमिळ)
संवाद लेखक : दीपक किंगराणी, ‘सिर्फ एक बंदा कॉफी है’ (हिंदी)
छायांकन : प्रशांतनु महापात्रा, ‘द केरळ स्टोरी’ (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: शिल्पा राव (चालिया – ‘जवान’, हिंदी), रोहित (प्रेमिथुन्ना – ‘बेबी’, तेलुगु)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : सुकृती बंदिरेड्डी (‘गांधी थाथा चेट्टू’, तेलुगु), कबीर खंदारे (जिप्सी, तमिळ), ट्रीशा तोषार, श्रीनिवास पोकळे, भार्गव (‘नाल २, मराठी)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : उर्वशी, ‘उलोझुक्कू’ (मल्याळम), जानकी बोडीवाला, ‘वश’ (गुजराती)
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता : विजयराघवन, ‘पुक्कलम’ (मल्याळम), एमएस भास्कर, ‘पार्किंग’ (तमिळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी, ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ (हिंदी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान, ‘जवान’ (हिंदी), विक्रांत मॅसी, ‘१२वी फेल’ (हिंदी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : सुदीप्तो सेन, ‘द केरळ स्टोरी’ (हिंदी)
AVGC मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘हनु-मन’ (तेलुगु)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : ‘नाल’ २’ (मराठी)
राष्ट्रीय, सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट : सॅम बहादुर (हिंदी)
सर्वोत्तम पदार्पण चित्रपट : ‘आत्मापॅम्फ्लेट’ (हिंदी)
सर्वोत्तम वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट : ‘१२वी फेल’ (हिंदी)
*नॉन-फीचर फिल्म्स
विशेष उल्लेख : एम के रामदास, ‘नेकल – क्रॉनिकल ऑफ द पॅडी मॅन’ (मल्याळम), हिमांसू शेखर खटुआ (दिग्दर्शक), कादंबिनी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड (निर्माता) ‘द सी अँड द सेव्हन व्हिलेजेस’
सर्वोत्तम पटकथा : चिदानंद नाईक, ‘सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो’ (कन्नड)
सर्वोत्तम व्हॉइसओव्हर : हरी कृष्णन यांचे ‘द सेक्रेड जॅक – एक्सप्लोरिंग द ट्री ऑफ विश’ (इंग्रजी)
सर्वोत्तम संगीत दिग्दर्शन : प्रणिल देसाई ‘द फर्स्ट फिल्म’ (हिंदी) (Film Awards announced)
सर्वोत्तम एडिटिंग : निलाद्री रॉय ‘मूव्हिंग फोकस’ (इंग्रजी)
सर्वोत्तम ध्वनी डिझाइन : शुभरुण सेनगुप्ता ‘धुंधगिरी के फूल’ (हिंदी)
सर्वोत्तम छायांकन : मीनाक्षी सोमन, सरवणमारुथु ‘लिटिल विंग्स’ (तमिळ)
सर्वोत्तम दिग्दर्शन : पियुष ठाकूर, ‘द फर्स्ट फिल्म’ (हिंदी)
सर्वोत्तम लघुपट : मनीष सैनी (दिग्दर्शक), एलनार फिल्म्स (निर्माता), ‘गिद्ध द स्कॅव्हेंजर’ (हिंदी)
सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट : ‘द सायलेंट एपिडेमिक’ (हिंदी), आकाश गुप्ता (दिग्दर्शक), ‘सिनेमा४गुड प्रायव्हेट लिमिटेड राहगिरी फाउंडेशन’ (निर्माता) (Film Awards announced)
सर्वोत्कृष्ट माहितीपट : ‘गॉड वल्चर अँड ह्युमन’ (इंग्रजी, हिंदी आणि तेलगू), ऋषिराज अग्रवाल (दिग्दर्शक), स्टुडिओ लिची, डॉ. राजेश चंदवानी (निर्माता)
सर्वोत्कृष्ट कला/संस्कृती चित्रपट : ‘टाइमलेस तमिळनाडू’ (इंग्रजी), कामाख्या नारायण सिंग (दिग्दर्शक), सेलिब्रिटी मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (निर्माता)
सर्वोत्कृष्ट चरित्रात्मक/ऐतिहासिक पुनर्रचना चित्रपट : ‘मो बौ मो गान, लेंटिना आओ’ (ओडिया), संजीब परासर (दिग्दर्शक), NFDC (निर्माता)
सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट : ‘द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव’ (मिझो), शिल्पिका बोरदोलोई (दिग्दर्शिका)
सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन फिल्म : ‘फ्लॉवरिंग मॅन’ (हिंदी), सौम्यजित घोष दस्तीदार (दिग्दर्शक), फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (निर्माता)
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक : उत्पल दत्ता (आसामी)
Rahul attacks EC: निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मत चोरी’ करतो : राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (१ ऑगस्ट) देशाच्या निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. (Rahul attacks EC)
आम्हाला जे सापडले आहे तो एक ‘अणुबॉम्ब’ आहे; निवडणूक आयोग भाजपसाठी ‘मत चोरी’ करत असल्याचे १००% पुरावे आमच्याकडे आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. (Rahul attacks EC)
निवडणूक आयोग भाजपसाठी मत चोरीचा मार्ग अवलंबत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोगावर (ECI) भाजपसाठी मत चोरीचा आरोप करत, राहुल गांधी यांनी दावा केला की त्यांनी आम्ही जे शोधले आहे तो ‘एक अणुबॉम्ब आहे, त्याचा स्फोट झाल्यावर आयोग गायब होईल, हे तुम्ही एकदा पहालच.’’
संसद संकुलात पत्रकारांशी बोलताना श्री. गांधी म्हणाले की, सुरूवातीला मध्य प्रदेशात आणि त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्हाला संशय आला होता. त्यानंतर महाराष्ट्रात, काँग्रेसने हा मुद्दा हाताळत एक पाऊल पुढे टाकले आणि राज्य पातळीवर त्याची चौकशी केली.
‘हे उघड सत्य आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी मतदान चोरीचा मार्ग अवलंबत आहे,’’ असे गांधी म्हणाले. (Rahul attacks EC)
इंडिया आघाडीच्या नेत्यानी लोकसभ अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन बिहारमधील विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रमावर चर्चा करण्याची मागणी करावी, असे पत्र दिले. त्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्ला चढविला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. तसेच त्यांच्या या ‘निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करा,’ असे म्हटले आहे.
वोट चोरी करने वाले याद रखें- बख्शा नहीं जाएगा pic.twitter.com/SkFiZt7M08
— Congress (@INCIndia) August 1, 2025
SC warns Himachal Govt: …अख्खा हिमाचल नकाशावरून नाहीसा होईल : सुप्रिम कोर्ट
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश राज्यातील पर्यावरणीय असंतुलनाबद्दल चिंता व्यक्त करताना, अनिर्बंध विकास असाच सुरू राहिला तर संपूर्ण राज्य देशाच्या नकाशावरून नाहीसे होईल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला. (SC warns Himachal Govt)
पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात पर्यावरणाची किंमत मोजून महसूल निर्माण करणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असू नये, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आणि या प्रदेशातील बिघडत्या पर्यावरणीय परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने काय पावले उचलली याची माहिती चार आठवड्यांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले.(SC warns Himachal Govt)
असंबंधित कारणांसाठी हरित कर निधीचे वळण रोखण्यासाठी योग्य देखरेख आवश्यक आहे हे लक्षात घेता,
“आम्ही राज्य सरकार आणि भारत केंद्राला हे पटवून देऊ इच्छितो की महसूल मिळवणे हे सर्वस्व नाही. पर्यावरण आणि पर्यावरणाची किंमत मोजून महसूल मिळवता येत नाही. हा प्रकार असाच सुरू राहिल्या तर अख्खा हिमाचल देशाच्या नकाशवरून एक दिवस गायब होईल, तो दिवस दूर नाही,” असे न्यायालयाने म्हटले आहे.
“आज आपण फक्त एवढेच सांगू इच्छितो की, हिमाचल प्रदेश राज्याने आपण जे पाहिले आहे त्याकडे लक्ष देण्याची आणि योग्य दिशेने लवकरात लवकर आवश्यक ती कारवाई करण्याची वेळ आली आहे. राज्यातील पर्यावरणीय असंतुलन आणखी बिघडू नये आणि नैसर्गिक आपत्ती येऊ नयेत हे पाहण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे. अर्थातच आतापर्यंत बरेच नुकसान झाले आहे, परंतु ‘‘काहीच नसण्यापेक्षा काहीतरी चांगले आहे’’ अशी एक म्हण आहे, असे न्यायालयाने पुढे म्हटले.(SC warns Himachal Govt)
श्री तारा माता टेकडीवरील हॉटेल बांधकाम करता येणार नाही, अशी अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. तसेच हा परिसर ‘ग्रीन एरिया’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयाविरुद्ध मेसर्स प्रिस्टाइन हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड उच्च न्यायालयात गेली होती. कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलावर निर्णय देताना न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले. या निर्णयामुळे राज्य सरकारने श्री तारा माता टेकडीवरील हॉटेल बांधण्याचा अधिकार नाकारला आणि त्या जागेवर सर्व खाजगी बांधकामांना बंदी घातली.
न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि राज्यातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अशी अधिसूचना आणल्याबद्दल राज्याचे कौतुक केले असले तरी, अशा अधिसूचना खूप आधीच लागू करायला हव्या होत्या, कारण राज्यातील पर्यावरणाचे आधीच बरेच नुकसान झाले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
न्यायालयाने कुल्लू आणि मनाली येथे अलिकडच्या ढगफुटीच्या घटनांकडे लक्ष वेधले आणि परिणामी दुर्घटनांना बेकायदेशीर वृक्षतोड आणि अनियंत्रित पायाभूत विकासाचे श्रेय दिले. असे निरीक्षण नोंदवले की अशा अनियंत्रित कृतींमुळे मातीची रचना कमकुवत झाली आहे, ज्यामुळे धूप वाढली आहे आणि नैसर्गिक आपत्तींना बळी पडण्याची शक्यता वाढली आहे.