कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय महिला आंतर विद्यापीठ ज्युदो स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या समीक्षा शिवाजी शेलारने ७० किलो वजन गटामध्ये ब्राँझ पदक पटकावले. ती छत्रपती शहाजी कॉलेजची विद्यार्थीनी आहे. (Samiksha Shelar Wins Bronze Medal in University Judo Competition)
भोपाळ येथील सेग युनिव्हर्सिटी येथे झालेल्या साऊथ वेस्ट झोन मध्ये तिने रौप्य पदक प्राप्त केले होते. तिला शिवाजी विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी ,प्रभारी प्र कुलगुरू डॉ.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ.व्ही.एन शिंदे, क्रीडा संचालक शरद बनसोडे, जुदो प्रशिक्षक डॉ.धनंजय पाटील, प्रा.ज्योती लेंगरे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. (Samiksha Shelar Wins Bronze Medal in University Judo Competition)
ताज्या बातम्या
अखिल भारतीय विद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत तन्वी मगदूमला सुवर्णपदक
कोल्हापूर : प्रतिनिधी : हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या तन्वी मगदूम हिने ५७ किलो वजन गटात अटीतटीच्या लढतीत सुवर्णपदकपदक पटकावले. तसेच सृष्टी जयवंत भोसले हिने ६५ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवले. (Tanvi Magdum Wins Gold Medal in Wrestling Competition)
विजयी खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी प्र -कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि क्रीडा संचालक प्रा.डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच संघाचे प्रशिक्षक डॉ विक्रम नागरे पाटील आणि डॉ प्रताप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. (Tanvi Magdum Wins Gold Medal in Wrestling Competition)
कोल्हापूर : प्रतिनिधी : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत “चंद्रकांत चषक -२०२६” फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला १८ मार्च पासून शाहू स्टेडियम येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या संघाला १ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, त्याच बरोबर उपांत्य फेरीत येणाऱ्या संघांना प्रत्येकी ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर महापालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव व राजेंद्र कुरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Chandrakant Cup Football Tournament Organized)
बालगोपाल तालीम मंडळाच्या आयोजित ही स्पर्धा १८ मार्च ते २९ मार्च या कालावधीत होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार यांच्या हस्ते बुधवारी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. आहे. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती संभाजी जाधव, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (Chandrakant Cup Football Tournament Organized)
स्पर्धेच्या निमित्ताने मैदानावर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांचे भव्य पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसेच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ १६ संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत.स्पर्धेतील उत्कृष्ट गोलकीपर, उत्कृष्ट डिफेन्स, उत्कृष्ट हाफ व उत्कृष्ट फॉरवर्ड या चार खेळाडूंना आकर्षक भेटवस्तू आणि गौरव चिन्ह, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला ३१ हजार रुपये, गौरव चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरवले जाणार आहे. प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा बहुमान मिळवणाऱ्या खेळाडूला ३१०० रूपये बक्षिस देण्यात येणार आहे.यावेळी उपाध्यक्ष निवास शिंदे, सेक्रेटरी राहुल चव्हाण, जॉईन सेक्रेटरी आप्पासाहेब साळोखे, युवराज कुरणे, रोहन शिंदे, सुदेश मगदूम, सुनील पोवार, कपिल मोहिते, अनिकेत सावंत आदी उपस्थित होते. (Chandrakant Cup Football Tournament Organized)
नवी दिल्ली : भारतीय किकेट नियामक मंडळाने इंडियन प्रिमियर लिग २०२६ हंगामाच्या पहिल्या वीस दिवसाचे वेळपत्रक जाहीर केले आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हेद्राबाद यांच्यात बेंगळुरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या काळात तीन राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. (IPL 1st match RCB vs SRH)
पहिल्या टप्प्यातील वीस सामने बेंगळुरु, मुंबई, गुवाहाटी, न्यू चंदीगड, लखनौ, कोलकोता, चेन्नई, दिल्ली, अहमदबाबद आणि हैद्राबाद येथे खेळवण्यात येणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी साडेतीन आणि रात्री साडेसात वाजता सामने सुरू होणार आहेत. हंगामातील पहिला डबल हेडर सामना चार एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी होणार आहे. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि रायस्थान रॉयल्स यांच्यातील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. (IPL 1st match RCB vs SRH)
सामन्यांचे वेळापत्रक असे, आरसीबी विरुद्ध एसआरएच २८ मार्च- संध्याकाळी. बेंगळुरू एमआय विरुद्ध केकेआर २९ मार्च संध्याकाळी. मुंबई आरआर विरुद्ध सीएसके ३० मार्च संध्याकाळी. गुवाहाटी पीबीकेएस विरुद्ध जीटी ३१ मार्च संध्याकाळी मुल्लानपूर. एलएसजी विरुद्ध डीसी १-एप्रिल संध्याकाळी लखनौ. केकेआर विरुद्ध एसआरएच २-एप्रिल संध्याकाळी कोलकाता. सीएसके विरुद्ध पीबीकेएस ३-एप्रिल संध्याकाळी चेन्नई. डीसी विरुद्ध एमआय ४-एप्रिल दुपारी दिल्ली. जीटी विरुद्ध आरआर ४-एप्रिल संध्याकाळी अहमदाबाद. एसआरएच विरुद्ध एलएसजी ५ एप्रिल दुपारी हैदराबाद. आरसीबी विरुद्ध सीएसके ५ एप्रिल संध्याकाळी बेंगळुरू. केकेआर विरुद्ध पीबीकेएस ६ एप्रिल संध्याकाळी कोलकाता. आरआर विरुद्ध एमआय ७ एप्रिल संध्याकाळी गुवाहाटी. डीसी विरुद्ध जीटी ८ एप्रिल २६ संध्याकाळी दिल्ली. केकेआर विरुद्ध एलएसजी ९ एप्रिल गुरुवार संध्याकाळी कोलकाता. आरआर विरुद्ध आरसीबी १० एप्रिल संध्याकाळी गुवाहाटी. पीबीकेएस विरुद्ध एसआरएच ११ एप्रिल दुपारी मुल्लानपूर. सीएसके विरुद्ध डीसी ११ एप्रिल संध्याकाळी चेन्नई. एलएसजी विरुद्ध जीटी १२ एप्रिल दुपारी लखनौ. एमआय विरुद्ध आरसीबी १२ एप्रिल संध्याकाळी मुंबई. (IPL 1st match RCB vs SRH)
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या मोतीबाग तालमीच्या वस्ताद पदी तालमीचे जेष्ठ मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी विष्णू जोशिलकर यांची एकमताने निवड करणेत आली. राजर्षी शाहू महाराजांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देण्यासाठी राजघराण्याची खास असलेल्या बागेवर मोतीबाग तालमीची उभारणी केली होती. या तालमीने देशाला अशियाई, राष्ट्रकुल पदक विजेत्या मल्लासह मातीच्या कुस्तीतील गदा पटकावणारे हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल दिले आहे. राज्यातील नामांकित तालमीचे वस्ताद पदाची धुरा जोशीलकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. (Joshilkar Motibag Talmi’s new creation)
करवीर नगरीतील कुस्ती क्षेत्रातील भीष्माचार्य बाळ दादा गायकवाड यांचे पुतणे प्रदिप गायकवाड यांनी पुढाकार घेवून मेळावा घेणेबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडे परवानगी मागितली होती. तालीम संघाच्या परवानगीनंतर मेळावा घेण्यात आला. कुस्ती क्षेत्रातील मरगळ दूर करणेसाठी व उर्जीत अवस्था आणणे कामी तालमीत नविन वस्ताद नेमणे व बुरुजबंद मल्ल घडवणे अशा सुचना सादर केल्या त्यास एकमताने मंजूरी दिली नविन वस्तादानी मोतीबाग तालीम व स्वागीय बाळ दादा गायकवाड यांचा वसा व वारसा पुढे शिस्तबद्द चालवावा असे मनोगत ज्येष्ठ मल्लांनी केले. (Joshilkar Motibag Talmi’s new creation)
तालीम संघाचे कार्याध्यक्ष संभाजी वरुटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अशोक माने यांनी वस्ताद पदी विष्णू जोशिलकर यांचे नाव सुचवले. त्याला माणिक मंडलिक आणि आर. के. पोवार यानी अनुमोदन दिल्याने एकमताने निवड करणेत आली. पुर्वीची मोतीबाग तालमीची व्यवस्थापन समिती कायम ठेवणेत आली. ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले बद्दल पै गौरव गुंडाजी पाटील यांचा सत्कार करणेत आला
यावेळी तालीम संघाचे सरचिटणीस अशोक पोवार, बी.एच.पाटील, बाजीराव कळत्रे, विजय सरदार, सुखदेव एरूडकर, प्रदिप गायकवाड, बाळासो मेटकर, आर.के.पोवार, संभाजी पाटील, माणिक मंडलिक यांनी तालीम संघ व मोतीबाग तालमीस उर्जीत अवस्था आणण्यासाठी सूचना केली.
यावेळी प्रकाश खोत, हिंदकेसरी विनोद चौगले, चंद्रकांत चव्हाण, निलेश देसाई, बाजीराव पाटील, सर्जेराव राऊ पाटील, जयकुमार शिंदे , बापू लोखंडे , संतोष कामते, सरदार वरुटे, विलास पाटील, शिवाजी कवठेकर, विक्रम माने, आनंदा खराडे, विजय पाटील, ज्युनिअर दादू चौगले, महेश नलवडे, रणजित पाटील आदी उपस्थित होते. आभार बटू जाधव यांनी मानले. (Joshilkar Motibag Talmi’s new creation)
अहमदाबादः येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या टी‑20 वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करून विजेतेपद मिळवले. या विजयाबरोबरच भारत तीन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश ठरला आहे. त्याचबरोबर सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारा आणि मायदेशात वर्ल्ड कप जिंकणाराही भारत पहिला देश ठरला आहे. भारताने यापूर्वी टी‑20 वर्ल्ड कप २००७ आणि टी‑20 वर्ल्ड कप २०२४ जिंकले होते. (India Win T20 World Cup 2026)
तीन अर्धशतकांसह ८०.२८च्या सरासरीने ३२१ धावा फटकावणा-या संजू सॅमसनची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली. तर १५ धावांत चार बळी घेणारा जसप्रीत बूमराह प्लॅअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आला.
न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे आव्हान
भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर २५६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. खरेतर भारत तीनशेपर्यंत धावांचे लक्ष्य ठेवेल, अशी एका टप्प्यावरची परिस्थिती होती. परंति जिमी नीशमने एका षटकात तिघांना बाद करून भारताच्या धावसंख्येला लगाम घातला. न्यूझीलंडची संपूर्ण टीम १९ ओव्हरमध्ये १५९धावांवर ऑलआउट झाली. त्यामुळे भारताने ९६ धावांनी विजय मिळवला. (India Win T20 World Cup 2026)
भारताच्या गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी
भारताच्या गोलंदाजांनी अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने चार ओव्हरमध्ये फक्त १५ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने ३ ओव्हरमध्ये २७ धावा देत ३ फलंदाज बाद केले. अर्धशतक झळकावणा-या इशान किशनने तीन अप्रतिम झेल घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलला. या तिघांबरोबरच संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माच्या कामगिरीमुळे भारताचा विजय सोपा झाला. (India Win T20 World Cup 2026)
न्यूझीलंडची खराब सुरुवात
२५६ धावांच्या मोठ्या लक्ष्यामुळे न्यूझीलंडचे ओपनर टिम सायफर्ट आणि फिन ऍलन यांच्यावर सुरुवातीपासूनच दबाव दिसत होता. पहिल्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडने फक्त चार धावा केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र सायफर्टने आक्रमक खेळ करत हार्दिक पंड्याला २१ धावा ठोकल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने फिन ऍलनला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने रचिन रवींद्रला बाद करून मोठा अडथळा दूर केला. पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडने ३ विकेट गमावून ५२ धावा केल्या. (India Win T20 World Cup 2026)
एकीकडे पडझड होत असताना सायफर्टने मात्र क्रीजवर टिकून राहून २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आठव्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याने मार्क चॅपमन यांना बाद केले. पुढच्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीने सायफर्टला बाद करून विजय भारताच्या आवाक्यात आणला. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ७२ अशी होती. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर आणि डॅरिल मिचेल यांनी थोडाफार प्रतिकार केला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. मात्र तेराव्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने डॅरिल मिचेलला बाद करून ही जोडी तोडली.
बुमराहचा घातक स्पेल
सोळाव्या ओव्हरमध्ये बुमराहने सलग विकेट्स घेतल्या. त्याने जिमी नीशम आणि मॅट हेन्री यांना बाद केले. त्यानंतर अठराव्या ओव्हरमध्ये त्याने कर्णधार सॅन्टनरलाही बोल्ड केले. सॅन्टनरने ४३ धावा केल्या. एकोणिसाव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्माने जेकब डफीला बोल्ड केले आणि न्यूझीलंडचा डाव१५९ धावांवर संपला. (India Win T20 World Cup 2026)
भारताची झंझावाती सुरुवात
भारताकडून सलामीला नेहमीप्रमाणे संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी जबाबदारी सांभाळली. या संपूर्ण वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या अभिषेक शर्माने या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध केली. सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये भारताने फक्त १२ धावा केल्या. पण तिसऱ्या ओव्हरपासून दोघांनी जोरदार फलंदाजी सुरू केली. चार ओव्हरमध्येच भारताचा स्कोर ५० पार गेला.
अभिषेक शर्माचे वेगवान अर्धशतक
अभिषेक शर्माने१८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्ले संपेपर्यंत भारताचा स्कोर 92 धावा झाला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात हा पॉवरप्लेमधील सर्वाधिक स्कोर ठरला. आठव्या ओव्हरमध्ये रचिन रवींद्रने आपल्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला विकेट कीपरकडे झेल द्यायला भाग पाडले. अभिषेकने २१ चेंडूत ५२ धावा केल्या.(India Win T20 World Cup 2026)
सॅमसन आणि किशनची शतकी भागीदारी
यानंतर ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी जोरदार फलंदाजी केली. दहा ओव्हरमध्ये भारताचा स्कोर 127 धावा झाला. संजू सॅमसनने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ही त्यांची सलग तिसरी अर्धशतकी खेळी होती. चौदाव्या ओव्हरमध्ये सॅमसनने रचिन रवींद्रच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारले. ईशान किशननेही २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली. १५ ओव्हरमध्ये भारताचा स्कोर २०० पार गेला.
शेवटच्या ओव्हर्समध्ये नाट्य
सोळाव्या ओव्हरमध्ये जिमी नीशमने तीन विकेट्स घेत न्यूझीलंडला थोडी उभारी दिली. त्याने संजू सॅमसन (८९), ईशान किशन (५४) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (०) यांना तंबूत पाठवले. यानंतर हार्दिक पंड्या १८ धावा करून बाद झाला.(India Win T20 World Cup 2026)
शेवटच्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने जिमी नीशमच्या गोलंदाजीवर २४ धावा काढल्या. शिवम दुबे ८ चेंडूत २६ धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे भारत अडीचशे पार जाऊन न्यूझीलंडला २५५ चे लक्ष्य देऊ शकला.
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या सरचिटणीस पदी अशोक बळीराम पोवार यांची निवड झाली. कार्यालयीन सचिवपदी संभाजी पाटील (कोपार्डे )यांचीही एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत तालीम संघाचे अध्यक्ष व्ही . बी .पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी सरचिटणीस पदाचा व यशवंतराव मुंडले यांनी कार्यालयीन सचिव पदाचा राजीनामा दिल्याने विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या. (Ashok Powar as the General Secretary of Talim Sangh)
अशोक पोवार यांचे नाव महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांनी सुचविल्यावर एकमताने निवड करण्यात आली. यावेळी हिंदकेसरी दीनानाथ सिंह, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील, विष्णू जोशीलकर, माजी महापौर आर. के. पोवार , माणिक मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. (Ashok Powar as the General Secretary of Talim Sangh)
बैठकीला हिंदकेसरी विनोद चौगुले, संभाजी वरुटे , महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे , गुंडाजी पाटील ,उपाध्यक्ष प्रकाश खोत. प्रदिप गायकवाड, अमृता भोसले सरदार पाटील, अशोक माने, मारुतीराव कातवरे, जयकुमार शिंदे, बटू जाधव, सरदार वरुटे, वस्ताद विश्वास हारूगले, सागर चौगले पै बाळासो मेटकर ,राजाराम चौगुले ,विलास पाटील बापू लोखंडे श्रीकांत भोसले सिकंदर कांबळे आर्दीसह जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. (Ashok Powar as the General Secretary of Talim Sangh)
शिलाँग : मेघालय राज्यातील लोकसभा खासदार आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (व्हीपीपी) नेते रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांचे गुरुवारी (दि.१९) सायंकाळी शिलाँगमध्ये फुटबॉल खेळताना अचानक निधन झाले. गुरुवारी रात्री पावनेनऊ वाजता त्यांच्या मृत्यूची घोषणा डॉक्टरांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मावलाई माविओंग येथे एका मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात खासदार सिंगकॉन सहभागी झाले होते. सामना सुरू असताना अचानक ते मैदानावर कोसळले. मैदानावर प्राथमिक उपचार करण्यासाठी मेडिकल सपोर्टने मैदानावर धाव घेतली. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये हलवले. पण त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जयाव येथील डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. (MP dies while playing football)
त्यांच्या निधनाची बातमी कळताच, उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टायनसॉन्ग, व्हीपीपी अध्यक्ष आर्डेंट मिलर बसैवमोइट, अनेक आमदार, वरिष्ठ राजकीय नेते आणि पक्ष कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी सिंगकॉन यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. (MP dies while playing football)
प्रथमच खासदार झालेले सिंगकॉन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर एक प्रमुख राजकीय व्यक्ती म्हणून उदयास आले होते.व्हीपीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवताना त्यांनी तीन वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले विन्सेंट एच. पाला यांचा ३.७ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला, ज्यामुळे मेघालयाच्या राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला. स्थानिकांच्या हक्कांसाठी तळागाळातील संपर्क आणि वकिलीसाठी ओळखले जात होते. (MP dies while playing football)
कोल्हापूर : प्रतिनिधी : आयपीएल-आयएसएलच्या धर्तीवर कोल्हापुरात मे महिन्यात महाराष्ट्र फुटबॉल लिग स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र लिगमध्ये राज्यातील विविध शहरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या १० वरिष्ठ पुरूष संघांचा सहभाग असेल. संघातील खेळाडूंची निवडही फ्रेंचायसी (बोली) पद्धतीने केली जाणार आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आणि प्रोस्पोर्ट्स यांच्यातर्फे ही स्पर्धा घेतली जाणार आहे. पत्रकार परिषदेला प्रोस्पोर्ट्सचे अनिरुद्ध पोले, माणीक मंडलीक, नंदकुमार बामणे, अमर सासने, राजेंद्र दळवी उपस्थीत होते. (Maharashtra Football League to be held in Kolhapur)
मालोजीराजे छत्रपती म्हणाले, फुटबॉलला कोल्हापूरकरांचे पाठबळ आहे. त्यामुळेच पहिले फुटबॉल लिग शाहू स्टेडियमवर मे महिन्यात घेतले जाणार आहे. १५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रोज २ सामने घेतले जातील. हे सामने प्रकाशझोतात पाहता येणार आहेत. स्थानिक खेळाडूंना यात वाव मिळावा यासाठी प्रत्येक संघात कोल्हापूरातील वरिष्ठ फुटबॉल संघातील किमान तीन खेळाडूंचा सहभाग अनिवार्य असेल. सामन्याचे तिकीट दर कमी असून डिजीटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण करण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे खेळाडूंना व्यावसायीक संधी मिळून खेळाचा दर्जा वाढेल. (Maharashtra Football League to be held in Kolhapur)
अनिरुद्ध पोले म्हणाले, स्पर्धेपुर्वी राज्यातील पुणे-मुंबई-नागपुर-कोल्हापूर या चार शहरांमध्ये खेळाडूंचा सराव घेऊन ५०० खेळाडू निवडले जातील. त्यातील खेळाडू संघ मालक बोली पद्धतीने निवडतील. स्पर्धेच्या माध्यमातून परदेशी ब्रॅँड स्थानिक फुटबॉलमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. (Maharashtra Football League to be held in Kolhapur)
कोलंबो : टी२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियावर खळबळजनक विजयाची नोंद करत स्पर्धेत सनसनाटी निर्माण केली. झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वेने १६९ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाचा डाव १४६ धावावर आटोपला. (Zimbabwe’s sensational victory over Australia)
झिंबाब्वेचे १६९ धावांचे आव्हान स्वीकारत ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. मुझाराबानीने जोश इंगलिसला ८ धावांवर बाद केले. कॅमेरिन ग्रीनला इव्हान्सने भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर मुझारानीच्या उसळता चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा फटकेबाज खेळाडू टीम डेव्हिड शून्यावर बाद झाला. कर्णधार हेडला इव्हान्सने क्लिन बोल्ड केले. ऑस्ट्रेलियाची स्थिती ४ बाद २९ अशी दयनीस झाली होती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ५९ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल संघाला सामना जिंकून देणार असताना सामन्यात ट्विस्ट आला. बर्लच्या चेंडूवर मॅक्सवेल बोल्ड झाला. त्याने ३१ धावा केल्या. दुखापतीमुळे मैदान सोडून बाहेर गेलेला मार्कस् स्टायनिस फलंदाजीला मैदानात उतरला. त्याने चौकार ठोकून चांगली सुरुवात केली. पण मासाकाटझ्घने त्याला बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरु शकला नाही. बन डिवाशियॉसने मारलेला वेगवान फटक्यांचे रुपांतर मुनयोंगाने अफलातून झेल घेतला. (Zimbabwe’s sensational victory over Australia)
ऑस्ट्रेलियाचा डाव ढासळल्याने प्रतिओव्हर १५ धावा काढण्याचे आव्हान होते. रॅनशॉने सुत्रे हाती घेतली. पण फटकेबाजी करण्याचा नादात रायन बर्लने त्याचा झेल टिपला. रेनशॉने ४४ चेंडूत ६५ धावा केल्या. रेनशॉ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या आशा मावळल्या. झिंबाब्वे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगले करत विजयाची नोंद केली. त्यांच्या ब्लेसिंग मुझाराबीने चार गडी बाद केले. इव्हान्सने तीन बळी मिळवले. (Zimbabwe’s sensational victory over Australia)
तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना झिंबाब्वे१६९ धावा केल्या. बेनेट आणि ताडिवानाशे मारुमानीने ६१ धावांची सलामी दिली. मारुमानीने ३५ धावा केल्या. स्टायनिशने त्याला बाद केले. त्यानंतर खेळाची सुत्रे ब्रायन बेनेट आणि रायन बर्लने घेतली. दोघांनी ५१ चेंडूत ७० धावांची भागिदारी केली. बर्लला ग्रीनने बाद केले. त्याने ३५ धावा केल्या. बेनेटला सिकंदर रझाची साथ मिळाली. या जोडीने २४ चेंडूत ३८ धावा चोपल्या. बेनेटने ५६ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली. (Zimbabwe’s sensational victory over Australia)