नवी दिल्ली : दिल्लीतील एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने संस्थेचा संचालक चैतन्यानंद सरस्वतीविरुद्ध लैंगिक छळाचे आरोप दाखल केले आहेत. (FIR lodged against Chaitanyananda)
एफआयआरनुसार, विद्यार्थिनीने गेल्या वर्षी पहिल्यांदा चैतन्यानंद यांच्याशी संवाद साधला होता. “सुरुवातीला तो माझ्याकडे विचित्रपणे पाहत होता. ते अत्यंत ओंगळवाणे चित्र होते,” असे तिने म्हटले आहे.
चैतन्यनंद अधूनमधून व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवू लागला. ‘‘बेबी, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तू खूप आवडतेस, तू आज सुंदर दिसतेस,’’ असे ते मेसेज असत. तसेच तिच्या केसांबद्दलही तो टिप्पणी करत असे.
त्याच्यावरील आरोप उघडकीस आल्यानंतर स्वयंघोषित आध्यात्मिक बाबा चैतन्यानंद सरस्वती फरार झाला आहे.
स्वामी पार्थसारथी उर्फ डॉ. पार्थसारथी स्वामी असे नाव असलेल्या या बाबाचा जवळजवळ १२ वर्षांपासून श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटशी संबंध आहे. (FIR lodged against Chaitanyananda)
या एफआयआरमुळे सरस्वतीभोवती सुरू असलेल्या वादांच्या यादीत भर पडली आहे. आता त्यांच्यावर लैंगिक छळ, फसवणूक आणि बनावटगिरीचे आरोप असलेले पाच गुन्हे दाखल आहेत.
२००९ मध्ये, त्यांच्यावर डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२०१६ मध्ये, एका विद्यार्थिनीने वसंत कुंज पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्यावर आरोपपत्रही दाखल करण्यात आले. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. हा खटला प्रलंबित असूनही तो या संस्थेत कार्यरत राहिला आहे.
या वर्षी, आणखी तीन गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत. एकामध्ये १७ मुलीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दुसरा बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दलचा आणि तिसरा गुन्हा एका मठाच्या ट्रस्टची फसवणूक केल्याचा आहे.
पोलिस सूत्रांनुसार, सरस्वती अनेकदा आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील मुलींना लक्ष्य करत असे. ‘‘माझ्या खोलीत या. मी तुम्हाला परदेशात घेऊन जाईन, त्यासाठी काही फी भरावी लागणार नाही,’’ असे संदेश पाठवत असे. जर माझे ऐकले नाही तर मी तुम्हाला कशात तर फसवीन, अशी धमकी देत असे, असे तपासअधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (FIR lodged against Chaitanyananda)
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की त्याच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे. पीडितांनी असाही दावा केला आहे की सरस्वतीने त्यांना त्याच्या फोनवरून गुन्हेगारी चॅट्स डिलीट करण्यास भाग पाडले. पोलिसांनी सांगितले की डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी डिव्हाइस फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
