Home » Blog » मतदान केंद्रात कायदा मोडल्याबद्दल आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

मतदान केंद्रात कायदा मोडल्याबद्दल आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

by प्रतिनिधी
0 comments
Case registered against MLA Santosh Bangar Hingoli Kalamanuri

मुंबई : नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकीत आरोप प्रत्यारोप, पैसे वाटप अशा प्रकारणांनी डागाळलेली असताना आमदार संतोष बांगर यांच्या कृतीने कायदा मोडण्याच्या कृतीने कळस गाठला आहे. आमदार बांगर यांनी मतदान केंद्रावर गोपनियतेचा भंग करताना एका वृद्धेला मतदान कसे करायचे याचे मार्गदर्शन ईव्हीएम मशिनजवळ केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही संतापले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  (Case registered against MLA Santosh Bangar, Hingoli, Kalamanuri)

हिंगोलीतील कळमनुरी येथे मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक तीन वर सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. मतदान केंद्रावर प्रवेश करत त्यांनी  मतदान केंद्रातच महिला मतदाराला प्रत्यक्ष ईव्हीएम बटन दाबताना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी मतदान केले. त्यावेळी त्यांच्या हातात मोबाईल होता. मतदारांना माध्यमांना बोट उंचावून मतदान केल्याची पोझ देत असताना  “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं”, अशी घोषणाबाजी केली. याचदरम्यान मोबाइल फोनचा वापरही त्यांनी केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मतदान केंद्रात घोषणाबाजी, मोबाइल वापरणे किंवा मतदाराला कोणताही निर्देश देणे हे निवडणूक गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली. विरोधी पक्षांनीही बांगर यांच्या कृतीचा निषेध करताना सत्ताधाऱ्यावर मुजोर असल्याची टीका केली. (Case registered against MLA Santosh Bangar, Hingoli, Kalamanuri)

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा फडणवीसांनी किमान लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसे वागतोय, आपण कोणता संदेश देत आहोत, याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत फडणवीसांनी बांगर यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. बांगर यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.. त्यानुसार आता काही तासांतच बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case registered against MLA Santosh Bangar, Hingoli, Kalamanuri)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00