Home » Blog » निवडणूक आयुक्तांना तुरुंगात टाका; संजय राऊतांची मागणी

निवडणूक आयुक्तांना तुरुंगात टाका; संजय राऊतांची मागणी

by प्रतिनिधी
0 comments
Raut demands that Gyanesh Kumar be jailed

मुंबई :प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगातील उफाळून आलेल्या वादांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या मनमानी कारभाराबद्दल त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. ज्ञानेशकुमारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत मिळून लोकशाहीची हत्या केली आहे असा आरोपही त्यांनी केला. (Raut demands that Gyanesh Kumar be jailed)

ज्ञानेश कुमारांना हाताशी धरुन शाहांनी निवडणूका जिंकल्या

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यप्रणालीवर आयोगातील निवडणूक आयुक्त सुखबीसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी १० महिन्यात लेखी १४ आक्षेप घेतले आहेत असे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे. खासदार राऊत यांनी ज्ञानेश कुमार चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक आयोगाचा कारभार करत असून तो कारभार देशासाठी घातक आहे अशी टीका केली. ज्ञानेशकुमारांना बरखास्त करुन त्यांच्यावर खटला दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. पश्चिम बंगाल आणि बिहार विधानसभा निवडणूका एसआयआरच्या माध्यमातून बेईमान पदधतीने अमित शाहांनी ज्ञानेश कुमार यांना हाताशी धरुन जिंकल्या आहेत असा आरोपही त्यांनी केला. (Raut demands that Gyanesh Kumar be jailed)

राष्ट्रपतींनी अधिकाराचा वापर करुन कारवाई करावी

निवडणूक आयोगातील दोन आयुक्त संधू आणि जोशी यांनी ज्ञानेशकुमार हे चुकीचे काम करत आहेत असा आक्षेप घेतल्याने मोदी आणि शाह यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. सरकारने कारवाई न केल्यास राष्ट्रपतीनी आपल्या अधिकाऱ्याचा वापर करुन ज्ञानेश कुमारात तुरुंगात टाकले पाहिजे. त्यासाठी लष्कराचीही मदत घ्यावी अशी मागणी केली. (Raut demands that Gyanesh Kumar be jailed)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!