कोल्हापूर : प्रतिनिधी : उंब्रजहून गोव्याकडे दहा किलो गांज घेऊन जाणाऱ्या दोघांकडून ९१ किलो गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. गांजाची किंमत २३ लाख ९० हजार रुपये आहे. गोव्यात विक्रीला जाणाऱ्या व्यक्तीकडून दहा किलो तर त्याच्या साथीदारांकडून ८० किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात तीन व्यक्तींना अटक केली. (Cannabis seized)
कोल्हापूर पोलिसांनी अंमलीपदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. चेतन मसुगटे आणि पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली आहेत. पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना कराडमधील एक व्यक्ती कोल्हापूरमार्गे गोव्याला गांजा विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी करवीर तालुक्यातील उचगाव येथे ग्रे रंगाच्या डिओ मोपेडवरुन संबंधित व्यक्ती जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी उचगाव पुलावर सापळा राचून फैय्याज अली मोकाशी (वय ३७, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता दहा किलो गांजा मिळाला.(Cannabis seized)
गांजा कुठून आणला याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील सोहेल मोमीन उर्फ सॅमकडून गांजा आणल्याचे सांगितले. दहा किलो गांजा गोव्यात विक्रीसाठी जाणार होतो असेही त्याने सांगितले. पोलिसांनी सोहल मोमीन (वय ३३ रा. उंब्रज) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गांजा कुठून आणला याची चौकशी केली असता त्याने सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी सोहेल मोमीनच्या मदतीने समीर उर्फ तौसिफ रमजान शेख (वय २१ रा. रहिमतपूर) याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गांजाबाबत चौकशी केली असता घरात गांजाचा साठा असल्याचे सागितले. पोलिसांनी त्याच्या घरातून ८१ किलो गांजा कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतला. दोघां संशयितांकडून ९१ किलो गांजा जप्त केल्या.(Cannabis seized)
पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मसगुटे, पोलिस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस अंमलदार वैभव पाटील, प्रविण पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, संतोष बरगे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, अशोक पोवार, परशुराम गुजरे, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, शिवानंद मठपती, नामदेव यादव, अनिल जाधव, यशवंत कुंभार, हंबीरराव अतिग्रे यांनी कारवाईत सहभाग घेतला.(Cannabis seized)
हेही वाचा :
घरकुलासाठी लाच; अभियंता जाळ्यात