Home » Blog » Business Loan : बिझनेस लोन मंजूर न केल्याने खून

Business Loan : बिझनेस लोन मंजूर न केल्याने खून

तीन संशयितांना अटक

by प्रतिनिधी
0 comments
Business Loan

कोल्हापूर : प्रतिनिधी : जबर मारहाण झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मयताची ओळख पटवली आणि तपास सुरू केला आणि तीन संशयितांना अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. बिझनेस लोन मंजूर करण्यासाठी मोठी रक्कम घेऊनही लोन मंजूर न केल्याने संशयितांनी केलेल्या मारहाणीत संबधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले. (Business Loan)

पुईखडीवर दळवींचा मृतदेह मिळाला.

करवीर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची माहिती दिली. तीन एप्रिल रोजी वाशी नाका परिसरात एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. करवीर पोलिस घटनास्थळी पोचले असता संबधित व्यक्ती मयत असल्याचे दिसून आले. मयताची ओळख पटवली असता संबधित व्यक्तीचे नाव प्रकाश जयवंत दळवी (वय ४५, रा. सासनेनगर, आयटीआय हॉस्पिटलच्या मागे) आहे. दोन दिवस दळवी बेपत्ता होते. आयटीआय परिसरातील व्यक्ती जुना वाशी नाका परिसरात जखमी अवस्थेत कसे सापडले याची चर्चा सुरू झाली. मयत प्रकाश दळवी यांच्या तोंड, कान आणि हातापायावर वळ दिसून आले. त्यांचा डोळा आणि कान सुजला होता. मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी तपास सुरू केला. (Business Loan)

दळवीने घेतले लोन मंजूर करण्यासाठी पैसे

तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्हीचा आधार घेऊन तपास करत असताना पोलिसांना प्रकाश दळवी यांची दोन व्यक्तीबरोबर दोन एप्रिलला रात्री आठ वाजता जरगरनगरात शिश बार येथे झटापट झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित सचिन भीमराव घाटगे (वय ३२, रा. शिरोली दुमाला ता. करवीर) आणि अजिंक्य शिवाजी शहापुरे (रा. अष्टविनायक पार्क, आर.के.नगर) या दोघांची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रकाश दळवी यांनी सचिन घाटगे याच्याकडून बिझनेस लोन मंजूर करण्यासाठी वेळोवेळी ऑनलाईनवर ६५ हजार रुपये घेतले होते. पण त्यांनी लोन मंजूर केले नाही. त्यांच्याकडे वेळोवेळी विचारणा केल्यावर प्रोसिजर सुरू आहे असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देत होते. (Business Loan)

बारमध्ये झटापट

प्रकाश दळवी हे शिश बार येथे मद्यपानास येतात अशी माहिती सचिन घाटगेला मिळाली. घाटगे आणि शहापुरे यांनी दळवी यांची भेट घेतली. त्याच्याकडे पैशाबाबत विचारणा केली असता कुठेले पैसे?, तुला काय करायचे आहे तर कर, असे म्हणून दळवीने सचिन घाटगेला शिविगाळ केली. सचिनने रागाच्या भरात दळवींना यांना मारहाण केली. त्यानंतर दळवींना घेऊन ते पुईखडी येथील निसर्ग लॉजच्या समोरील मोकळ्या जागेत आले. तिथे सचिनने कोल्हापूरी चप्पलने  दळवींना जबर मारहाण केली. (Business Loan)

शेतातील खोपीत डांबून ठेवले

मारहाणीत त्यांचा उजवा डोळा आणि कान सुजला. दळवी पोलिसांकडे तक्रार करेल या भितीने सचिन घाटगे याने बट्टू उर्फ रोहित रामचंद्र कांबळे (वय २८) योगेश गुंडा खोंद्रे (वय ३१), ओकार अनिल पाटील (तिघे रा. शिरोली दुमाला. ता. करवीर) यांना बोलावून घेतले. पुईखडीवरुन दळवी यांना सचिन घाटगेने आपल्या शिरोली दुमालातील शेतातील खोपीत डांबून ठेवले. रात्रभर डांबून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला योगेश खोंद्रे आणि ओंकार पाटीलने पुन्हा वाशीनाका येथे सोडले. जखमी अवस्थेतील प्रकाश दळवी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सचिन घाटगे, बट्टू कांबळे, योगेश खोंद्रे, यांना अटक केली. (Business Loan)

यांनी केला तपास  

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक नाथा गळवे, पोलिस हवालदार रणजीत पाटील, विजय तळसकर, सुजय दावणे, राहूल देसाई, अशोक नंदे, सुभाष सरवडे, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विजय पाटील, अमोल चव्हाण यांनी तपास केला. (Business Loan)

हेही वाचा :

भारतीय किसान युनियनच्या नेत्याची हत्या

विनयभंग करणाऱ्या पोलिसाला कोठडी

 कामरा यांच्या याचिकेवर मुंबई पोलिसांना नोटीस

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00