Home » Blog » Boost to startups : स्टार्टअप आणि पर्यटनक्षेत्राला बुस्ट

Boost to startups : स्टार्टअप आणि पर्यटनक्षेत्राला बुस्ट

अर्थसंकल्पावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

by प्रतिनिधी
0 comments
Budget reaction

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे स्टार्टअप आणि पर्यटनक्षेत्राला बुस्ट मिळणार आहे. तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून आर्थिक वाढही सुकर होणार असल्याची प्रतिक्रीया या क्षेत्रांतील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या. (Budget reaction)

एम्ब्रेस कन्सल्टिंगच्या संस्थापक श्रुती स्वरूप यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले. ‘अर्थसंकल्प आर्थिक सक्षमीकरणाची लाट आणणारा आहे. १२ लाख रुपयांपर्यंत आयकर नसल्यामुळे हजारो-लाखो लोकांचा आर्थिक ताण कमी करेल. मध्यमवर्गीयांसाठी ही खूपच दिलासा देणारी बाब आहे.’

त्या म्हणाल्या, ‘टॅक्स स्लॅबमधील हा प्रगतशील बदल दीर्घकाळापासून प्रतीक्षेत होता. देशभरातील सर्व स्तरातील करदात्यांना समृद्ध करेल, त्यांना दिलासा देईल. तितकेच, ‘मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ ची घोषणाही समृद्धतेकडे नेणारी आहे. जागतिक दर्जाच्या पाच राष्ट्रीय कौशल्य केंद्रांची स्थापना, भारताची जागतिक स्पर्धात्मकता आणि कार्यबल क्षमता वाढविण्यासाठी एक गेम चेंजर ठरणर आहे. दीर्घकाळापासून ज्याची गरज होती ती कौशल्य विकास, आर्थिक वाढ यामुळे शक्य होणार आहे.(Budget reaction)

‘स्टार्टअप इकोसिस्टमसाठी परिवर्तनवादी’

प्लुटोसोनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार रोहित महाजन यांनी, अर्थसंकल्प भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमसाठी परिवर्तनवादी असल्याचे म्हटले आहे. स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीसह नवीन निधीची स्थापना केली जाईल. या टप्प्याद्वारे सक्षम झालेल्या वित्तपुरवठ्यामुळे देशभरातील बहुसंख्य नावीन्य आणि स्केलिंग पुढे येईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रथमच महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींतील उद्योजकांना पाच लाखांपर्यंतचा निधी मिळेल. भारताच्या स्टार्टअप जगतात सर्वसमावेशकता आणि विविधता दिसून येईल. उद्योजकता आता या शक्यतेसह जोडली गेली आहे.

पर्यटन क्षेत्रासाठी भक्कम पाऊल

द होस्टेलरचे संस्थापक आणि सीईओ प्रणव डांगी म्हणाले, ‘भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक मजबूत पाऊल या अर्थसंकल्पात उचलले गेल्याचे दिसते. पायाभूत सुविधांच्या विकासावर भर, मुद्रा कर्जाद्वारे होमस्टेसाठी प्रोत्साहन आणि हॉटेल व्यवसायाशी चांगला मेळ घातल्यामुळे पर्यटनक्षेत्राला बळ मिळेल. शिवाय, ५० पर्यटन स्थळांच्या विकासामुळे भारताचे जागतिक पर्यटनातील स्थान निश्चितच मजबूत होईल. पर्यटन परवडणाऱ्या दरात आणि सुलभ पद्धतीने होण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे या क्षेत्राचा निश्चितच फायदा होणार आहे.

हेही वाचा :

बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त
३६ जीवरक्षक औषधे करमुक्त

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00