नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. हा ‘लोकांचा अर्थसंकल्प’ आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे लोकांच्या हाती जास्त पैसा खेळत राहील. त्यामुळे गुंतवणुकला चालना मिळेल आणि आर्थिक विकास वाढ होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. (Budget PM)
सरकारने तरुणांसाठी अनेक क्षेत्रे खुली केली आहेत. या माध्यमातून ते विकसित भारत मिशन पुढे नेतील, असे सांगून ते म्हणाले, ‘अर्थसंकल्प हा सहसा सरकारचे उत्पन्न वाढवण्यावर भर देतो, परंतु सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प लोकांच्या खिशात अधिक पैसा टाकण्याचा, बचत वाढवण्याचा आणि नागरिकांना विकासाच्या प्रवासात भागीदार बनवण्याचा प्रयत्न करतो.’
उत्पादन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात मांडलेल्या उपाययोजनांमुळे भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर आपली चमक दाखवता येईल, असे ते म्हणाले.
कर सवलतीमुळे मध्यमवर्गीय आणि पगारदार कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या अर्थसंकल्पातील घोषणा कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणतील. (Budget PM)
सुधारणेच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यांपैकी अणुऊर्जेसाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणे ही बाब ऐतिहासिक आहे. त्यामुळे देशाच्या विकासात नागरी अणुऊर्जेचे मोठे योगदान सुनिश्चित होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
गंभीर दुखण्यावर किरकोळ मलमपट्टी : राहुल गांधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘गंभीर दुखण्यावर केलेली किरकोळ मलमपट्टी’ असल्याची टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केले. तसेच अर्थसंकल्पात ‘कल्पनांची दिवाळखोरी’ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
देशापुढील आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी प्रतिमान बदलण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. (Budget PM)
जागतिक अनिश्चिततेच्या काळात देशावरील आमच्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी आपले अर्थविषयक प्रतिमान बदलावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये व्यक्त केली.
काँग्रेसने यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पात स्थिर वास्तव वेतन, उपभोगात मोठ्या प्रमाणात उलाढालीचा अभाव, मंदावलेली खासगी गुंतवणूक आणि गुंतागुंतीच्या जीएसटी प्रणालीच्या ‘आजारां’वर उपचार नसल्याची टीका केली होती. (Budget PM)
नरेंद्र मोदी सरकार एनडीएचे सहयोगी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारला ‘बोनान्झा’ देऊ करत आहे. दुसरीकडे याच आघाडीचा आणखी एक आधारस्तंभ असलेल्या आंध्र प्रदेशकडे ‘अक्षम्य’ दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
A band-aid for bullet wounds!
Amid global uncertainty, solving our economic crisis demanded a paradigm shift.
But this government is bankrupt of ideas.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 1, 2025
हेही वाचा :
बारा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त
स्टार्टअप आणि पर्यटनक्षेत्राला बुस्ट
३६ जीवरक्षक औषधे करमुक्त