नवी दिल्ली : न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणारे अमेरिकन एअरलाइन्सचे विमान बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीमुळे रोमला वळवण्यात आले. एएफपी वृत्तसंस्थेने विमानतळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असे वृत्त दिले आहे. या प्रवासी विमानाचे सुरक्षित लँडिंग दोन लढाऊ विमानांच्या मदतीने करण्यात आले. (Bomb threat)
न्यूयॉर्कच्या जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २२ फेब्रुवारी रोजी अमेरिकन एअरलाइन्सचे एए२९३ विमान दिल्लीच्या दिशेने प्रवास करत होते. या विमानात १९९ प्रवाशांसह विमानातील क्रू मेंबर होते. प्रवासादरम्यान या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यानंतर लगेचच हे बोईंग विमान रोमच्या दिशेने वळवून फ्युमिसिनो विमानतळावर उतरवण्यात आले. (Bomb threat)
इटलीच्या एएनएसए वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचा मार्ग ऐनवेळी बदलण्यात आला. विमानतळ अधिकाऱ्यांनी एबीसी न्यूजला सांगितले की, विमान लिओनार्डो दा विंची रोम फ्युमिसिनो विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे. एअरलाईनने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही आमच्या प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतो. (Bomb threat)
एएफपीच्या वृत्तानुसार, धोक्याची सूचना मिळताच प्रोटोकॉलनुसार या प्रवासी विमानाला दोन लढाऊ विमानांनी इटालियन विमानतळावर नेले. विमानतळावर सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप उतरवण्यासाठी हवी ती मदत देण्यात आली. दरम्यान, या घटनेचा विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. ‘कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसंदर्भात तक्रार केल्यानंतर’ यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने विमान सुरक्षितपणे उतरल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
हेही वाचा :