Home » Blog » BJP leaders : भाजपचे ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर

BJP leaders : भाजपचे ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर

‘सांगली ग्रामीण’ ला सम्राट महाडिक यांना संधी

by प्रतिनिधी
0 comments
BJP leaders

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी च्या राज्यातील संघटनात्मक निवडीचे काम पूर्णत्वाकडे चालले असून आज मंगळवारी प्रदेश कार्यकारिणीने ५८ जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा भाजप प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी चैनसुख संचेती यांनी केली. वादातील २० जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी अद्याप जाहीर केल्या नाहीत. त्यामध्ये कोल्हापूर महानगर, छत्रपती संभाजीनगरमधील एक, चंद्रपूर शहर आणि ग्रामीण, नाशिक यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिला असल्याने भाजप जिल्हाध्यक्षपदी निवडीवर त्याची छाप पडली आहे. (BJP leaders)

भाजप एकनिष्ठ असलेल्यांना जिल्हाध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे, तरीही काही ठिकाणी भाकरी फिरवली आहे.  दुसऱ्या पक्षातून आलेल्या काहींना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची निवड झाली. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांचे ते बंधू आहेत. सातारा जिल्हाध्यक्षपदी अतुल भोसले, कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर पश्चिम (करवीर) अध्यक्षपदी नाथाजी पाटील, सांगली शहर अध्यक्षपदी  प्रकाश ढंग यांची निवड झाली. (BJP leaders)

निवड झाली यादी अशी  

कोकण विभाग

सिंधुदुर्ग – प्रभाकर सावंत,  रत्नागिरी उत्तर – सतीश मोरे,  रत्नागिरी दक्षिण – राजेश सावंत,  रायगड उत्तर – अविनाश कोळी,  रायगड दक्षिण – धैर्यशील पाटील,  ठाणे शहर – संदीप लेले, ठाणे ग्रामीण – जितेंद्र डाके, भिवंडी – रवीकांत सावंत,  मीरा-भाईंदर – दिलीप जैन,  नवी मुंबई – डॉ. राजेश पाटील,  कल्याण – नंदू परब, उल्हासनगर – राजेश वधारिया.

पश्चिम महाराष्ट्र

पुणे शहर – धीरज घाटे, पुणे उत्तर (मावळ) – प्रदीप कंद, पिंपरी चिंचवड शहर – शत्रुघ्न काटे, सोलापूर शहर – रोहिणी तडवळकर, सोलापूर पूर्व – शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिम – चेतनसिंग केदार, सातारा – अतुल भोसले, कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) – राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर पश्चिम (करवीर) – नाथाजी पाटील, सांगली शहर – प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण – सम्राट महाडिक.

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार – निलेश माळी, धुळे शहर – गजेंद्र अंपाळकर, धुळे ग्रामीण – बापू खलाने, मालेगाव – निलेश कचवे, जळगाव शहर – दीपक सुयवंशी, जळगाव पूर्व – चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिम – राध्येश्याम चौधरी, अहिल्यानगर उत्तर – नितीन दिनकर, अहिल्यानगर दक्षिण – दिलीप भालसिंग.

मराठवाडा

नांदेड महानगर – अमर राजूरकर, परभणी महानगर – शिवाजी भरोसे, हिंगोली – गजानन घुगे, जालना महानगर – भास्करराव दानवे, जालना ग्रामीण – नारायण कुचे, छत्रपती संभाजीनगर उत्तर – सुभाष शिरसाठ, छत्रपती संभाजीनगर पश्चिम – संजय खंबायते, धाराशिव – दत्ता कुलकर्णी.

विदर्भ

बुलढाणा – विजयराज शिंदे,  खामगाव – सचिन देशमुख, अकोला महानगर – जयवंतराव मसणे, अकोला ग्रामीण – संतोष शिवारकर, वाशिम – पुरुषोत्तम चितलांगे, अमरावती शहर – डॉ. नितीन धांडे, अमरावती ग्रामीण (मोर्शी) – रवीराज देशमुख, यवतमाळ – प्रफुल्ल चव्हाण, पुसद – डॉ. आरती फुफाटे, मेळघाट – प्रभुदास भिलावेकर, नागपूर महानगर – दयाशंकर तिवारी, नागपूर ग्रामीण (रामटेक) – अनंतराव राऊत, नागपूर ग्रामीण (काटोल) – मनोहर कुंभारे, भंडारा – आशु गोंडाने, गोंदिया – सिता रहांगडाले.

मुंबई

उत्तर मुंबई – दीपक बाळा तावडे, उत्तर पूर्व मुंबई – दीपक दळवी, उत्तर मध्य मुंबई – विरेंद्र म्हात्रे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00