Home » Blog » Bank fraud : आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरचा कोटीला गंडा

Bank fraud : आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरचा कोटीला गंडा

गुंतवणुकीच्या आमीषाने १२ जणांची फसवणूक

by प्रतिनिधी
0 comments
Bank fraud

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुदत ठेव आणि म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजरने १२ ग्राहकांना अंदाजे एक कोटी रुपयांचा गंडा घातला. विकास आण्णाप्पा माळी (वय ३८, सध्या रा. जरगनगर, कोल्हापूर,  मूळ रा. केंपवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन माळीला अटक केली आहे.(Bank fraud)

आयसीआयसीआय बँकेच्या क्रशर चौक आणि शिरोली एमआयडीसी शाखेत विकास माळी काम करत होता. त्याने १२ ग्राहकांना मुदत ठेव आणि म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ती रक्कम चार मित्रांच्या खात्यावर वर्ग केली. (Bank fraud)

या गुन्ह्यात गजानन सदाशिव गायकवाड (वय ४४, रा. कुपवाड रोड, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. विकास माळी हा जुलै २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधित आयसीआयसीआय बँकेच्या शिरोली एमआयडीसी आणि क्रशर चौकातील शाखेत मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याने काही ग्राहकांना मुदत ठेव आणि मॅच्युअल फंडातून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. (Bank fraud)

त्याने १२ ग्राहकांचे ९६ लाख ६० हजार १८ रुपये त्याने चार मित्रांच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर ती रक्कम स्वत:च्या बँक खात्यावर वर्ग केली. पुढे ते पैसे झेरोधा ब्रोकिंगमध्ये स्वत:च्या आयडीवर गुंतवले. याचा कोणताही लाभ ग्राहकांना दिला नाही. परतावा न मिळाल्याने आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही ग्राहकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर बँकेने केलेल्या तपासणीत मॅनेजर माळीने १२ ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा :
 चिनी डीपसीकने अमेरिकेला भरवली धडकी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00