Home » Blog » Attempted attack on police : पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून हल्ल्याचा प्रयत्न ; तिघांना अटक

Attempted attack on police : पोलिस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून हल्ल्याचा प्रयत्न ; तिघांना अटक

by प्रतिनिधी
0 comments
Attempted attack on police

कोल्हापूर : प्रतिनिधी :  रस्ता अडवून वाढदिवस साजरा करणाऱ्यांना पोलिसांनी हटकल्यावर तिघांनी पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर धरुन हल्ल्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली.  (Attempted attack on police)

शहराजवळील लक्षतीर्थ वसाहतीत ही घटना घडली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी सराईत गुंड सादिक मोहम्मद पाटणकर (वय २०), अवधूत पिराजी गजगेश्वर (१९) आणि आदित्य राहुल भोजणे (२२, तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील हवालदार सामंत यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्री हवालदार सामंत आणि सौरव कोळी हे दोघे कर्मचारी लक्षतीर्थ वसाहत येथे गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन गेले. शाहू चौकात काही तरुण रस्त्याच्या मध्ये दुचाकी लावून अदित्य भोजने याचा वाढदिवस साजरा करत होते. यावेळी मोठ्याने आरडाओरड सुरू होता. पोलिसांनी तरुणांना हटकले आणि रस्त्यांवर वाढदिवस साजरा करु नका असे सांगताच सादिक पाटणकर  अवधूत गजगेश्वर आणि भोजणे हे शिवीगाळ करीत पोलिसांच्या अंगावर धावून गेले. यातील पाटणकर याने हवालदार सामंत यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. भर चौकात गुंडांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा आणि कॉलर पकडण्याचा प्रकार घडल्याने सामंत यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तिन्ही हल्लेखोरांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. अटकेतील तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मारामारी, धमकावणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, जीवघेणा हल्ला करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Attempted attack on police)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00