Home » Blog » AVAS for EV: इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी अलर्ट सिस्टम सक्तीची करणार…

AVAS for EV: इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी अलर्ट सिस्टम सक्तीची करणार…

by प्रतिनिधी
0 comments
AVAS for EV

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ता सुरक्षेचा विचार करून १ ऑक्टोबर २०२७ पासून सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकसाठी अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. (AVAS for EV)

मंत्रालयाने एका मसुद्याच्या अधिसूचनेत तसे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२६ नंतर उत्पादित होणाऱ्या इलेक्ट्रिक प्रवासी आणि मालवाहू वाहनांच्या सर्व नवीन मॉडेल्समध्ये AVAS असणे आवश्यक आहे. EV मध्ये ते एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे. पादचारी आणि रस्त्यांवरील इतरांना त्यामुळे सतर्कता बाळगता येणे सोपे होणार आहे. (AVAS for EV)

” १ ऑक्टोबर २०२६ रोजी आणि त्यानंतर नवीन मॉडेल्सच्या बाबतीत आणि १ ऑक्टोबर २०२७ रोजी विद्यमान मॉडेल्सच्या बाबतीत, श्रेणी M आणि N च्या विद्युतीकृत वाहनांमध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या AIS-१७३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या श्रवणीयतेच्या बाबतीत AVAS आवश्यकता पूर्ण करणारे AVAS बसवले जातील,” असे अधिसूचनेत म्हटले आहे.

श्रेणी M च्या विद्युतीकृत वाहनांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी डिझाइन केलेल्या इलेक्ट्रिक कार आणि बसेसचा समावेश आहे, तर श्रेणी N मध्ये इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या ट्रक आणि मालवाहू वाहनांचा समावेश आहे.

अमेरिका, जपान आणि युरोपियन युनियनच्या काही देशांनी आधीच हायब्रिड वाहनांमध्ये AVAS चा वापर अनिवार्य केला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00