Home » Blog » Attempt to rape : तिच्यावर विपरीत प्रसंग ओढवला, पण तिने…

Attempt to rape : तिच्यावर विपरीत प्रसंग ओढवला, पण तिने…

बेंगळुरूमधील युवतीने हिमतीने केला सामना

by प्रतिनिधी
0 comments
Attempt to rape

बेंगळुरू : बेंगळुरूमधील युवतीने हिमतीने केला सामनाकॅबमधून मित्राकडे जायला निघालेल्या २४ वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर कारमध्ये घुसून दोघांनी बलात्काराचा प्रयत्न केला. या कठीण परिस्थितही तिने हिमतीने प्रतिकार केला. आरडाओरडा केला. तिच्या ओरडण्याने शेजारी मदतीला धावले. कॅब ड्रायव्हरनेही तिला मदत केली. त्यामुळे तिच्यावरचा भयंकर प्रसंग टळला. (Attempt to rape)

ईशान्येकडील राज्यातील ही युवती आहे. ती सध्या कमनहल्ली येथे राहते. तिला व्हाईटफिल्डमधील एका मित्राला तिच्या घरी आणायचे होते. तिने पहाटे दोनच्या सुमारास एग्रीगेटरकडून कॅब बुक केली. कॅब आल्यावर ती घरातून बाहेर पडली. कारचा दरवाजा बंद करत असताना दोन अनोळखी व्यक्ती ती बसलेल्या सीटवर घुसण्याचा प्रयत्न केला. तिने त्यांच्यावर वाद घातल्यावर या दोघांनी धक्काबुक्की केली. त्या दोघांना कारमध्ये बसण्यास आक्षेप घेतला. चालकानेही दोघांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्याने या दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. (Attempt to rape)

दोघां युवकांचा पवित्रा पाहून युवती कारमधून बाहेर पडली आणि घराकडे पळू लागली. त्यातील एकाने तिचा पाठलाग केला. तिचा गळा पडकला. तिने निसटण्याचा प्रयत्न केला. युवकाने तिला मारहाण करुन  ढकलले. तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, असे पीडितने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याने तिचा लैंगिक छळही केला. यावेळी कॅब ड्रायव्हरने दुसऱ्या युवकाबरोबर युवकांशी लढत होता. अखेर त्या युवतीने जोरात आरडाओरडा केल्यावर परिसरातील नागरिक झोपेतून जागे झाले. ते घराबाहेर आल्यावर दोघांनी पळ काढला. युवतीने हेल्पलाईन ११२ वर कॉल केला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. तिची तक्रार ऐकून घेतली. संबंधित युवतीची दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षा होती.  परीक्षा दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून रितसर तक्रार नोंदवून घेतली. (Attempt to rape)

मुलीच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्ती २० ते ३० वयोगटातील होते. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलीस अन्य ठिकाणचे फुटेज तपासत आहेत.

यापूर्वीही घडली होती घटना

यापूर्वी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या नागालँडमधील युवतीवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. ती तिच्या सहकाऱ्यासह कॅबमधून परत येत होती. ऑगस्ट २०२३ मध्ये लिंगराजपुरमजवळ पहाटे साडेतीन वाजता एका युवकाने चाकूचा धाक दाखवून कार थांबवली. या शस्त्रधारी युवकाच्या तावडीतून सुटका करुन ती युवती पळून गेली. पण युवकाने तिचा पाठलाग करत तिला विवस्र केले. ती एका घरात घुसली, घरमालकाने हल्लेखोरापासून तिची सुटका केली, पण हल्लेखोराने केलेल्या चाकूहल्ल्यात घरमालक जखमी झाला. या घटनेतील १८ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.

हेही वाचा :

सहायक पोलीस निरीक्षकाला मारहाण

नऊ भारतीयांचा सौदी-अरेबियात मृत्यू

लखनौ, प्रयागराज तुंबले!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00