बेंगळुरू : प्रतिनिधी : सासूला मारण्यासाठी एका चाळीस वर्षीय महिलेने डॉक्टरांकडे गोळ्यांची मागणी केली. डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी संबंधित महिलेकडे विचारणा केली असता आपण स्वत: आत्महत्या करणासाठी सासूचे नाव सांगून गोळ्या मागितल्याचा जबाब दिला. (Attempt to kill)
उत्तर बेंगळुरातील संजयनगर येथील डॉ. सुनील कुमार यांना एका महिलेने व्हॉटस्ॲपद्वारे गोळ्या देण्यासंबंधीचा मेसेज पाठवला. हा मेसेज वाचल्यावर डॉक्टरांना धक्का बसला. डॉ. सुनील कुमार संबंधित महिलेला ‘डॉक्टर जीव वाचवण्यासाठी असतात. जीव घेण्यासाठी नाहीत’ असा मेसेज टाकला. त्यानंतर महिलेने डॉक्टरांना टाकलेले सर्व मेसेज डिलिट केले.
डॉ. सुनील कुमार यांनी मंगळवारी पोलिसांशी संपर्क साधून महिलेची ओळख पटवून तिच्यावर कारवाई करण्याची विनंती केली. डॉ. सुनील कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महिलेची मागणी धक्कादायक होती. आपण कोणत्या काळात जगत आहोत हे पाहून माझ्या मनाला वेदना झाल्या. सासूला मारण्यासाठी एका डॉक्टरची मदत घेण्याच्या विचाराने मला धक्का बसला. डॉक्टर जीव वाचवण्यासाठी असतात जीव घेण्यासाठी नाही, असे मी संबंधित महिलेला सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने मला पाठवलेले सर्व मेसेज डिलिट केले, पण त्या महिलेने पाठवलेले मेसेज स्क्रीनशॉटद्वारे सेव्ह केले. हे स्क्रीनशॉट मी पोलिसांना दिले आहेत. (Attempt to kill)
डॉ. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, “तिने कन्नडमध्ये टाईप केले. तिने मला काहीतरी विचारायचे आहे असे सांगितले. मी सासूला शिविगाळ केली तर काय होईल, असे तिने विचारले. त्यावर हे कशाबद्दल विचारता?, असे मी तिला विचारले. नंतर तिने मला वृद्ध सासूला मारण्यासाठी काही गोळ्या लिहून देण्यासाठी सांगितले. सासू ७० वर्षाची असून ती तिला सतत त्रास देत असते, असे तिचे म्हणणे होते.” डॉक्टरांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. (Attempt to kill)
पोलिसांनी संबंधित महिलेचा सायंकाळपर्यंत शोध घेतला. तिला पोलिस ठाण्यात चौकशीला बोलावले. ती पतीसमवेत पोलिस ठाण्यात आली. तिने सांगितले की मला प्रत्यक्षात आत्महत्या करायची होती. मी सासूला मारु इच्छित नव्हते. तिने पोलिसांना असे सांगितले की “जर मी डॉक्टराकडे आत्महत्या करण्यासाठी गोळ्या मागितल्या असत्या तर त्यांनी नक्कीच नकार दिला असता. म्हणून मी वेगळ्या पद्धतीने विचारले. त्यांनी गोळ्या लिहून दिल्या असत्या तर त्या गोळ्या खाऊन मी स्वत: आत्महत्या केली असती.’’
संबंधित महिला ४० वर्षाची आहे. तिचा पती ड्रायव्हर आहे. त्यांना एक लहान मुलगी आहे.
हेही वाचा :
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकपाल कक्षेत नाहीत
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ