Home » Blog » Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या ५० विकेट पूर्ण

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या ५० विकेट पूर्ण

विजय हजारे ट्रॉफीमध्ये गाठला महत्त्वाचा टप्पा

by प्रतिनिधी
0 comments
Arjun Tendulkar

मुंबई : डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने विजय हजारे ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेदरम्यान कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या स्पर्धेत गोवा संघातर्फे खेळणाऱ्या अर्जुनने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पन्नास विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याच्या खात्यात आता ४१ सामन्यांमध्ये ५१ विकेट्स आहेत. (Arjun Tendulkar)

हजारे स्पर्धेत गोवा विरुद्ध ओडिशा सामन्यात अर्जुनने बळींचे अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ६१ धावांत ३ विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. २०२१ मध्ये मुंबईतर्फे पदार्पण करणाऱ्या अर्जुनने आतापर्यंत १७ ‘लिस्ट ए’ सामन्यांमध्ये २४, तर २४ टी-२० सामन्यांमध्ये २७ विकेट घेतल्या आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये त्याने प्रत्येकी एकदा डावामध्ये ४ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. याशिवाय, २५ वर्षीय अर्जुनच्या नावावर १७ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ३७ विकेट जमा आहेत. (Arjun Tendulkar)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या २०२५ च्या मोसमासाठी मागील महिन्यात झालेल्या लिलावामध्ये अर्जुनला कराराविना राहावे लागले होते. त्यानंतर, मुंबई इंडियन संघानेच त्याला पुन्हा करारबद्ध केले. (Arjun Tendulkar)

हेही वाचा :

माझ्याकडून नामांकन भरताना त्रुटी

बेन स्टोक्स तीन महिने संघाबाहेर

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00