Home » Blog » Akhilesh slams yogi : प्रयागराजमधील भाविकांची स्थिती गंभीर

Akhilesh slams yogi : प्रयागराजमधील भाविकांची स्थिती गंभीर

अखिलेश यादव यांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Akhilesh slams yogi

नवी दिल्ली : प्रयागराजमधील वाहतूक कोंडीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.  त्यामुळे भाविकांची स्थिती गंभीर होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. (Akhilesh slams yogi)

प्रयागराजमधील भीषण वाहतूक कोंडीवरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, वाहतूक कोंडीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाकुंभमेळ्याला भेट देणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे.

प्रयागराजमध्ये सर्वत्र वाहतूक कोंडीमुळे अन्नधान्य, भाजीपाला, मसाले, औषधे, पेट्रोल-डिझेल मिळत नाही. त्यामुळे प्रयागराज आणि महाकुंभ परिसरात अडकलेल्या कोट्यवधी भुकेल्या, तहानलेल्या, थकलेल्या आणि दमलेल्या भाविकांची स्थिती गंभीर आहे, असे यादव यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Akhilesh slams yogi)

‘ज्याप्रमाणे राज्यांमध्ये घटनात्मक व्यवस्था बिघडली की दुसऱ्यावर जबाबदारी सोपवण्याचा आदेश काढला जातो, त्याचप्रमाणे महाकुंभातील अनागोंदी पाहता सक्षम व्यक्तीकडे राज्यकारभाराची सूत्रे सोपवावी. व्यवस्थेत बसलेले अपात्र लोक लोक खोटा प्रचार करू शकतात, ते व्यवस्था  बदलू शकत नाहीत, ’ असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला आहे. (Akhilesh slams yogi)

प्रयागराजमध्ये कोणताही जबाबदार अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. “मुख्यमंत्री ‘संपूर्ण अपयशी’ ठरले आहेत. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि प्रयागराजशी संबंधित अनेक नामवंत मंत्री बेपत्ता आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, प्रयागराज राज संगम स्थानक ९ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान बंद राहणार आहे. महाकुंभमधील गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याची घोषणा अधिकाऱ्यांनी सोमवारी केली. मात्र इतर ८ स्थानकांवरून नियमित आणि विशेष गाड्या धावतील. त्यामध्ये प्रयागराज छेओकी, नैनी, प्रयागराज जंक्शन, सुभेदारगंज, प्रयाग, फाफामाऊ, प्रयागराज रामबाग आणि झुसी या स्थानकांचा समावेश आहे.

हेही वाचा :

 ‘महाकुंभ’मध्ये वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा
 बेळगावच्या चार भाविकांवर घाला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00