कराड : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिमांचा सहभाग होता, अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वक्तव्ये करताना संयम ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.(Ajit Pawar slams Rane)
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त अजित पवार कऱ्हाड येथील प्रीतीसंगमावर आले होते. स्मृतिस्थळावर आदराजंली वाहिल्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. राणे यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना विचारले असते ते म्हणाले, “सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकेल अशी विधाने करण्यापासून सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्या देशात अनेक मुस्लिम देशभक्त आहेत. इतिहासकारांनी केलेल्या सखोल संशोधनानंतर असे सिद्ध झाले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते.” शिवाजी महाराजांच्या दारुगोळा विभागाचा प्रमुख कोण होता तर तो मुस्लिम होता याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. अशा प्रकारची अनेक उदाहरणे देता येतील, असेही ते म्हणाले. (Ajit Pawar slams Rane)
मंत्री राणे यांनी हे विधान का केले आणि त्यांचा उद्देश काय होता हे माहीत नाही. भारतातील मुस्लिम देशभक्त आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित म्हणाले. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. प्रीतीसंगमावर अभिवादन केल्यानंतर पवार मुंबईला परतले.(Ajit Pawar slams Rane)
हेही वाचा :
जी.बी.एस.’ रोखण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथक