Home » Blog » Aditya criticize goyal : मुंबईच्या खासदाराकडून विश्वासघात

Aditya criticize goyal : मुंबईच्या खासदाराकडून विश्वासघात

आदित्य ठाकरेंची टीका

by प्रतिनिधी
0 comments
Aditya criticize goyal

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांच्यावर कडवट शब्दात टीका केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून सीजीपीडीटीएमचे मुख्यालय दिल्लीला नेण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र अदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टवर जोडले आहे. या विषयावर मुंबईच्या खासदाराने विश्वासघात केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री गोयल यांच्यावर केला आहे. (Aditya criticize goyal)

मुंबईतील अनेक कार्यालये यापूर्वी दिल्लीला हलवण्यात आली आहेत. तसेच महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जातो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून सीजीपीडीएमचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात येणार असल्याच्या पत्रावरुन आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Aditya criticize goyal)

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्याने किती लज्जास्पद कृत्य केले आहे. ज्या माणसाने त्याला निवडून दिले त्याने मुंबईचा विश्वासघात केला आहे. भाजपच्या प्रत्येक कृतीतून मुंबईचा अपमान करण्यात येत आहे. तसेच आपल्या जखमांवर भाजपकडून मीठ चोळण्यात येत आहे. त्या मंत्र्याला वाटते की राज्यांनी केंद्र सरकारला दिलेल्या योगदानासाठी केंद्राकडून आपला योग्य वाटा मागू नये. हे मुख्यालय हलवण्याची काय गरज आहे, असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

हेही वाचा :

प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ
शिंदे-पवार आणि संमेलनाचे राजकारण
‘वक्फ जेपीसी’वरुन विरोधकांचा सभात्याग

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00