Home » Blog » Action against cat owner : ३५ मांजरे पाळणाऱ्या घरावर कारवाई

Action against cat owner : ३५ मांजरे पाळणाऱ्या घरावर कारवाई

by प्रतिनिधी
0 comments
Action against cat owner

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने एका घरात पाळलेली तब्बल ३५ हून अधिक मांजरे पाळलेल्या घरावर कारवाई केली.  मांजरे पाळलेल्या घरामध्ये मांजराची विष्ठा आणि खाद्य पदार्थ्यांच्या वासामुळे स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेने ही कारवाई केली. महानगरपालिकेने ३५ हून अधिक मांजरासह त्या घरातील दोन ट्रॅक्टर ट्रॉली कचरा काढला. (Action against cat owner)

रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबुले व त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी बेकायदेशीर घरामध्ये पाळीव मांजरे पाळली होती. या घरात यापुर्वी ३५ पेक्षा जास्त मांजरे त्यांनी पाळली होती. यामुळे घरामध्ये दुर्गंधीयुक्त कचरा व आडगळ करुन त्यांनी ठेवल्याची स्थानिक नागरिकांकडून तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती. तसेच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिलेली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने आयरेकर गल्लीतील बुलबुले यांच्या घरीजाऊन बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त करून घरातील दुर्गंधीयुक्त कचरा व आडगळ असा दोन ट्रॅक्टर कचरा काढला. घरामध्ये तसाच कचरा व घाण असल्याने संपूर्ण गल्लीत घाण वास येत होता. (Action against cat owner)

आरोग्य विभागाच्या कारवाईवेळी तीन मांजरे पकडली उर्वरित पाळीव मांजरे पळून गेली. ही कारवाई करताना महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यास त्यातील एक मांजर चावले. त्यामुळे या कर्मचा-यास त्वरीत उपचारासाठी दवाखाण्यामध्ये नेण्यात आले. सदरची कारवाई अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, नंदकुमार पाटील, सहाय्यक आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, सुरज घुणकीकर, मुकादम व कामगारांनी केली. (Action against cat owner)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00