पुणे : बजाज पुणे ग्रँड सायकल टूरमध्ये मंगळवारी झालेल्या अपघातात सायकली एकमेकांवर आदळून ६० सायकलस्वार जखमी झाले. जवळपास ६० हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर वेगाने धडकले. तिकोना किल्याजवळील अरुंद रस्त्यांवर हा अपघात झाला. या अपघातामुळे मोठी खळबळ माजली असून अनेक सायकलस्वारांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. (Accident at the Pune International Cycling Competition)
पुणे जिल्हा सायकललिंग असोसिएशन आयोजित या स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली होती. या स्पर्धेचे ४३७ किलोमीटर अंतर असून बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ असे स्पर्धेचे नाव आहे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्यावतीने भारतात प्रथम या स्पर्धेचे आयोजन केल्याने प्रचंड उत्सुकता होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले होते. मंगळवारी तिकोना किल्याजवळ कमी रुंदीच्या रस्त्यांवर अपघात झाले. ६० हून अधिक सायकली एकमेकांवर आपटल्या. काही सायकलींचे तुकडे झाले. अपघातानंतर घटनास्थळी तैनात रुग्णवाहिका आणि डॉक्टरांनी धाव घेत सायकलस्वारांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. (Accident at the Pune International Cycling Competition)
या अपघाताचे खापर आयोजकांवर फोडले जात आहे. स्पर्धेच्या सुरक्षिततेचे नियम पाळले नसल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तिकोना किल्ल्याजवळ अरुंद भागाची माहिती खेळाडूंना अगोदर का दिली नाही याकडे लक्ष वेधले जात आहे. या वळणावर सुरक्षेसाठी गरजेच्या बॅरिकेडिंग आणि धोक्याच्या सूचना देणार फलक लावले नसल्याचे दिसून आले. (Accident at the Pune International Cycling Competition)