नवी दिल्ली : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. बुधवारी (९ जुलै) दुर्घटना घडल्याचे संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. (A Jaguar crashed)
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुरू जिल्ह्यातील रतनगड शहरात हे विमान कोसळले. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी पोलिस पथके घटनास्थळी पाठवण्यात आली, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
अपघाताची कोर्ट एन्कॉयरी करण्यात येणार असल्याचे आयएएफने सांगितले.
“आयएएफचे जग्वार ट्रेनर विमान आज नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान राजस्थानमधील चुरूजवळ कोसळले,” असे एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वैमानिकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे आयएएफने म्हटले आहे.
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
आधीच्या वृत्तानुसार, “दुर्घटनास्थळाजवळ मानवी अवशेष सापडले आहेत,” असे एसएचओ कमलेश यांनी सांगितले. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची शक्यता दिसून येते. तथापि, भारतीय हवाई दलाकडून मृतांची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (A Jaguar crashed)
३ महिन्यांत दुसरा अपघात
या वर्षी जॅग्वार विमानाचा हा दुसरा अपघात आहे. एप्रिलमध्ये, गुजरातमधील जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान आणखी एक आयएएफ जॅग्वार कोसळले. (A Jaguar crashed)
ते विमान जामनगर शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुवर्दा गावाजवळील एका मोकळ्या मैदानात कोसळले.
त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन वैमानिकांपैकी एक सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला, तर दुसऱ्याचा मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना आढळला.
हेही वाचा :
गुजरातमध्ये पूल कोसळला; आठ जणांचा मृत्यू
तरूण डॉक्टरची अटल सेतूवरून उडी घेत आत्महत्या