नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप मोठे ‘वैयक्तिक नुकसान’ झाले आहे. ते माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड
होते. विद्वत्ता, कुलीनता आणि नम्रतेचे ते प्रतीक होते. त्यांच्या निधनाने देशाने एक आदर्श नेता गमावला आहे, अशा शब्दांत काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. Sonia Gandhi
सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय जीवनात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असेही त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
मनमोहन सिंग यांच्यासारखा नेता आपल्याला मिळाला याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला आणि भारतातील जनतेलाही कायम अभिमान राहील. देशांतील जनता त्यांच्याप्रति नेहमीच कृतज्ञ राहील. भारताच्या प्रगती आणि विकासात त्यांनी अतुलनीय योगदान आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. Sonia Gandhi
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने, आपण विद्वत्ता, कुलीनता आणि नम्रतेचे प्रतिक असलेला नेता गमावला आहे. त्यांनी आपल्या देशाची अत्यंत अंत:करणपूर्वक सेवा केली. काँग्रेस पक्षासाठी एक तेजस्वी आणि प्रकाशमान मार्गदर्शक तारा होते. त्यांनी कोट्यवधी भारतीयांचे जीवन समृद्ध केले. Sonia Gandhi
सिंग यांचे हृदय शुद्ध आणि विशाल होते. अत्यंत निर्मळ मनाने त्यांनी भारतीय जनतेवर प्रेम केले. त्यांचा सल्ला नेहमीच मार्गदर्शक होता. जगभरातील नेते आणि विद्वानांनी त्यांचा आदर केला, त्यांचे कौतुक केले. विद्वान आणि अत्युच्च आदर असलेले राजकारणी म्हणून त्यांचा जगभरातील नेत्यांनी गौरव केला. त्यांनी भूषविलेल्या पदाला त्यांच्यामुळे वेगळी उंची आणि प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी भारताला अभिमान आणि सन्मान मिळवून दिला, या शब्दांत श्रीमती सोनिया गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा :
कर्मयोगी
मणिपूर आणि मनमोहन सिंग
𝐂𝐨𝐧𝐠𝐫𝐞𝐬𝐬 𝐏𝐚𝐫𝐥𝐢𝐚𝐦𝐞𝐧𝐭𝐚𝐫𝐲 𝐏𝐚𝐫𝐭𝐲 𝐂𝐡𝐚𝐢𝐫𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧 𝐒𝐦𝐭. 𝐒𝐨𝐧𝐢𝐚 𝐆𝐚𝐧𝐝𝐡𝐢 𝐣𝐢’𝐬 𝐦𝐞𝐬𝐬𝐚𝐠𝐞 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐩𝐚𝐬𝐬𝐢𝐧𝐠 𝐨𝐟 𝐃𝐫 𝐌𝐚𝐧𝐦𝐨𝐡𝐚𝐧 𝐒𝐢𝐧𝐠𝐡 𝐣𝐢.
In Dr Manmohan Singh’s passing, we have lost a leader who was the epitome… pic.twitter.com/3rE8I8u8TE
— Congress (@INCIndia) December 27, 2024