Home » Blog » शायना एनसी यांनी फाडला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो

शायना एनसी यांनी फाडला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो

by प्रतिनिधी
0 comments
Shaina NC tore a photograph of Balasaheb Thackeray

मुंबई : प्रतिनिधी : सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांच्याविषयी अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे पक्षांकडून त्यांच्या पुस्तकांची पाने फाडून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. चूक लक्षात आल्यावर  शायना यांनी माफी मागितली. पण त्यांच्या कृतीबद्दल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांकडून खरपूस टीका करण्यात आली. खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी तीव्र शब्दात टीका करत शायना यांच्या कृतीचा निषेध केला. (Shaina NC tore a photograph of Balasaheb Thackeray)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निषेध

पत्रकार परिषदेत शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो फाडला. शायना एनसी यांनी जो फोटो फाडला त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला मारताना दिसत आहेत. मात्र ही चूक लक्षात येताच शायना एनसी यांनी फाडलेला फोटो खाली ठेवत दुसरा फोटो हातात घेतला. सोनिया गांधी यांच्या पुतस्कात स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर दोन पाने लिहिली असून त्यांनी टीका केली. त्याबद्दल शिवसेनेकडून पुस्तकाची पाने फाडत निषेध केला.

यांना जाहीरपणे फटके मारले पाहिजेत…

या घटनेनंतर खासदार संजय राऊत यांनी एक्स वर पोस्ट करत टीका केली आहे. राऊत यांन पोस्टमध्ये असे म्हटले आहे की,  अमित शहा यांच्या शिंदे सेनेचे लोक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहेत. कारण हे सगळे भाडोत्री आहेत, बरे झाले हे काळतोंडे आणि पांढऱ्या पायाचे लोक पळून गेले! यांना ना कोणता विचार ना नैतिकता, ना एकच नेता ना निष्ठा..मा. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या  या सगळ्यांच्या सीटवर  जाहिरपणे चाबकाचे फटके मारले पाहिजेत! मला आशा आहे मराठी माणूस तरी माझ्या या भाषेवर आक्षेप घेणार नाही! (Shaina NC tore a photograph of Balasaheb Thackeray)

बाळासाहेबांचा नव्हे, मणिशंकर अय्यरांचा फोटो फाडला

शायना एनसी यांनी टीकेनंतर एक्स वर पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये म्हणतात, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेला आज मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा इतका पुळका का आला आहे? मी एकदा नाही, हजारदा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडेन! सावरकरांचा अपमान करणाऱ्यांविरोधात माझा निषेध ठाम आहे आणि तो असाच राहील. हिंमत असेल तर सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक फाडून दाखवा!

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही

बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानांचा निषेध करत त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. मग आज उद्धव ठाकरे यांच्यात तीच हिंमत आहे का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून दाखवणार का?की काँग्रेसच्या सत्तेच्या आणि राजकीय स्वार्थाच्या मोहापुढे सावरकरांचा स्वाभिमानही गहाण ठेवला आहे?एक गोष्ट स्पष्ट ऐका — मणिशंकर अय्यरचा फोटो असो किंवा सावरकरांचा अपमान करणारे पुस्तक, मी ते एकदा नाही, हजारदा फाडेन!स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणे, हीच आमची भूमिका आणि हीच स्वातंत्र्यवीरांना खरी मानवंदना! (Shaina NC tore a photograph of Balasaheb Thackeray)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!